अ‍ॅपशहर

​ आनंदी-आनंद गडे!

आनंदी कडवे या नावाने गृह प्रवेश करून ती घरात आली. विशेष म्हणजे आमच्या लग्नाला ७ मार्च, २०१७ रोजी ३० वर्षं पूर्ण होत आहेत. मुख्य म्हणजे नावातच आनंदी आनंद! म्हणतात ना 'आनंदाचे डोही, आनंद तरंग' कितीही राग रुसवा झाला तरीही नेहमी आनंदी असणं हा तिचा गुणधर्म आहे. आमच्या संसार वेलीवर सन १९८८ ते १९९६ या आठ वर्षात तीन कन्या रत्न आली.

Maharashtra Times 6 Jun 2017, 12:46 am
सुधाकर कडवे, अलिबाग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम happiness all over
​ आनंदी-आनंद गडे!


आनंदी कडवे या नावाने गृह प्रवेश करून ती घरात आली. विशेष म्हणजे आमच्या लग्नाला ७ मार्च, २०१७ रोजी ३० वर्षं पूर्ण होत आहेत. मुख्य म्हणजे नावातच आनंदी आनंद! म्हणतात ना 'आनंदाचे डोही, आनंद तरंग' कितीही राग रुसवा झाला तरीही नेहमी आनंदी असणं हा तिचा गुणधर्म आहे. आमच्या संसार वेलीवर सन १९८८ ते १९९६ या आठ वर्षात तीन कन्या रत्न आली. आज मोठी मुलगी बी.एस.सी, बी. एड करून शिक्षिका आहे, दुसरी फिजिओथेरेपिस्ट आहे, तर तिसरी मुलगी हॉटेल मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाला आहे. खूप कठीण परिस्थितीत मुलींना शिक्षण देण्यात माझ्या प्रियेचा सिंहाचा वाटा आहे. कारण मी एका छोट्या कंपनीत काम करताना माझं उत्पन्न फार कमी होतं. पण माझ्या सहचारीणीला व्यवसायाची पुष्कळ आवड आहे. शिक्षण अजिबात नसून व्यवहार ज्ञानात खूप अग्रेसर आहे. घर सांभाळून तसंच व्यवसायावर लक्ष केंद्रित करून मुलींना स्वतःच्या पायावर उभं करताना तिने स्वतःच्या इच्छा आकांक्षाना मुरड घालून कधीच कोणत्या गोष्टीचा हट्ट न करता मिळेल त्या परिस्थितीत समाधानी असते. मी जेव्हा कामावरुन घरी यायचो तेव्हा संध्याकाळी पहिले तिचं दर्शन व्हायचं. कधी ती घरात दिसली नाही तर मी लगेच अस्वस्थ व्हायचो. ती जर एक दिवस किंवा रात्र घरात नसली तरी नुसत्या कल्पनेनेच मला त्रास होतो. तर जाता-जाता काही ओळी खास तुझ्यासाठी...
चंदेरी नव्हता काळ, तू चंदेरी केलास,
आसवांच्या ओलाव्याने त्यास सिंचलास,
दृढतेने संसार डोलारा सावरलास,
तीन मोत्यांना शिंपल्यात सामावले,
हिऱ्या-माणक्यांपरी पैलू पाडलास,
जीवनाच्या संध्याछायेत तू सोबत असावीस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज