अ‍ॅपशहर

संसार फुलवणारी लतिका

आमचं लग्न १९८६च्या मे महिन्यात झालं. माझी पत्नी लतिकाने आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली आहे. लग्नानंतर सुखी संसारात दोन मुलं आहेत. माझी नोकरी तशी बऱ्यापैकी चांगली असल्यामुळे पैशाची चणचण फार कधी भासली नाही.

Maharashtra Times 18 Oct 2016, 12:16 am
किशन भवर, विरार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kishan bhavar writting about his partner
संसार फुलवणारी लतिका

आमचं लग्न १९८६च्या मे महिन्यात झालं. माझी पत्नी लतिकाने आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली आहे. लग्नानंतर सुखी संसारात दोन मुलं आहेत. माझी नोकरी तशी बऱ्यापैकी चांगली असल्यामुळे पैशाची चणचण फार कधी भासली नाही. आमच्या लग्नाच्या आधीपासूनच भावाची तीन मुलं माझ्याकडे शिक्षणासाठी होती. आमच्याकडे पाहुण्यांची बरीच वर्दळ असे. सर्व पाहुण्यांची सरबराई करण्यात लतिकाने कोणतीही कसूर ठेवली नाही. पुरणपोळी आणि भजी करण्यात लतिकाचा हातखंडा आहे. पर्यटन, वाचन आणि नाटक पाहणं हे छंद आम्ही दोघांनीही जोपासले आहेत. आम्हा दोघांनाही पर्यटनाची जबरदस्त आवड असल्यामुळे नांदेडचे काळे आणि परभणीच्या देशमुख कुटुंबासह आम्ही चारधाम यात्रा पूर्ण केल्या. गतवर्षी थायलंड आणि यावर्षी सिंगापूर, मलेशिया ही परदेशवारीही आम्ही दोघांनी पूर्ण केली. लतिकाची दागिन्याची आवडही तशी बेताचीच. आमच्या संसारात आतापर्यंत फार काही दुःखाचे डोंगर कोसळलं नसलं तरी आल्या त्या परिस्थितीला धीराने तोंड देण्यात लतिका नेहमीच पुढे असते. जेव्हा ती घरी नसते त्यावेळी माझ्या अस्ताव्यस्तपणामुळे घराचं रणांगण होतं. तिच्या अनुपस्थितीत घर खायला उठतं. ती नसली म्हणजे माझे काहीच खरं नसतं. नोकरीनिमित्त जिंतूर, औरंगाबाद आणि मुंबई या प्रवासात लतिकाने मला भरभरुन साथ दिली. माझ्या संसार वेलीला नेहमी टवटवीत ठेवणारी लतिका मला अर्धांगिनी म्हणून लाभली हे माझं भाग्यच.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज