अ‍ॅपशहर

तिला दीर्घायुष्य लाभो!

आमचं लग्न ४ मे, १९८० रोजी झालं. आमच्या लग्नाला ३७ वर्षं पूर्ण झाली. अजूनही मागे वळून पाहताना असं वाटतं की, किती भराभर वर्षं निघून गेली. आदर्श सहचारिणी, धर्मपत्नी, सदैव हसतमुख, शांत, कधी न चिडणारी, सर्वांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागणारी, सदैव मदतीला धावून येणारी अशी ही माझी गृहलक्ष्मी आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी माझ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पण त्याही परिस्थितीत ती न डगमगता खंबीरपणे माझ्या पाठीशी पर्वताप्रमाणे उभी राहिली.

Maharashtra Times 23 Oct 2017, 12:09 am
सुबोध कर्णिक, बदलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my better half
तिला दीर्घायुष्य लाभो!

आमचं लग्न ४ मे, १९८० रोजी झालं. आमच्या लग्नाला ३७ वर्षं पूर्ण झाली. अजूनही मागे वळून पाहताना असं वाटतं की, किती भराभर वर्षं निघून गेली. आदर्श सहचारिणी, धर्मपत्नी, सदैव हसतमुख, शांत, कधी न चिडणारी, सर्वांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागणारी, सदैव मदतीला धावून येणारी अशी ही माझी गृहलक्ष्मी आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी माझ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पण त्याही परिस्थितीत ती न डगमगता खंबीरपणे माझ्या पाठीशी पर्वताप्रमाणे उभी राहिली.
संसाररूपी सागरात अनेक संकटं आली, अनेक वादळे आली, पण तरीही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहून आमच्या संसाराची नौका व्यवस्थितपणे तरंगत ठेवली. घरातच काय पण बाहेर ही सर्वांना एकाच धाग्याने बांधून ठेवणारी अशा या माझ्या धर्मपत्नीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्या मुलाचं व मुलीचं नुकतंच लग्न झालं. मुलगाही खूप समजूतदार व घरातल्या प्रत्येकासाठी सदैव पाठीशी उभा राहणारा आहे. मुलगीही खूप प्रेमळ आहे. घरासाठी त्यांनी खूप कष्ट केले, त्याग केला. त्याच मेहनतीचं फळ देवाने त्यांना दिलं. सूनही आमच्यात अगदी मिसळून गेली आहे, जावई पण छान आहे.
आमचा आठ वर्षांचा नातू आहे, त्याला आजी घरात नसली की करमत नाही. तो आजीला नेहमी म्हणतो की, 'आजी, तू बाहेर जाऊ नकोस'. मुलीची मुलगी म्हणजे आमची नातही खूप गोड आहे. आज आमच्या संसारात आम्ही खूप सुखी, आनंदी आहोत. अजूनही आमची भावंडं व बहीण जमले की, नेहमी म्हणतात सर्वाना धाग्यांनी जोडणारी ३७ वर्षं झाली तरीही तशीच आहे. अगदी आनंदी, हसतमुख मनमिळाऊ आहे. तिला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज