अ‍ॅपशहर

सारे कसे सुनेसुने

लग्नाचा वाढदिवस ही खरंतर आनंदाची गोष्ट पण २०१६सालचा वाढदिवस मात्र माझ्यासाठी फार वाईट होता. कारण माझी पत्नी मला कायमची सोडून गेली होती. १८मे १९६९ला आमचं लग्न झालं तेव्हा लीला विठ्ठल जाधवची ती मंदाकिनी वसंत सावंत झाली. डिलाइल रोडच्या दहा बाय दहाच्या रुममध्ये तिने अत्यंत सुखाने, हसतमुखाने संसार केला.

Maharashtra Times 29 Jun 2016, 12:45 am
>> वसंत सावंत, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nastes ghari tu jevha
सारे कसे सुनेसुने


लग्नाचा वाढदिवस ही खरंतर आनंदाची गोष्ट पण २०१६सालचा वाढदिवस मात्र माझ्यासाठी फार वाईट होता. कारण माझी पत्नी मला कायमची सोडून गेली होती. १८मे १९६९ला आमचं लग्न झालं तेव्हा लीला विठ्ठल जाधवची ती मंदाकिनी वसंत सावंत झाली. डिलाइल रोडच्या दहा बाय दहाच्या रुममध्ये तिने अत्यंत सुखाने, हसतमुखाने संसार केला. प्रत्येक अडीअडचणीत ती माझ्यासोबत होती. बेताच्या परिस्थितीतही तिने आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभं केलं. इतक्या वर्षांत ती कधीच मला एकट्याला सोडून कुठेच गेली नव्हती. आमचा संसार, मुलं, नातवंडं, सुना हेच तिचं जग होतं. सध्या आम्ही पनवेलला मोठ्या घरात सुखाने राहत होतो. एकाएकी १४ मार्चला ती हृदयविकाराच्या झटक्याने अचानक हे जग सोडून गेली. आता ती नसल्यामुळे आयुष्य भकास वाटत आहे. प्रत्येक क्षणी मला तिची आठवण येते. तिच्याशिवाय आयुष्य फारच कठीण झालंय. खरोखर ती नसल्याने मन सैरभैर झालं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज