अ‍ॅपशहर

साथ दे तू मला...

माझं लग्न १४ मार्च १९७६ रोजी झालं. माझ्या जीवनात धमृबाई वैती ही​ माझी पत्नी म्हणून आली आणि धर्मुबाईचं संगीता तुर्भेकर म्हणून लागलं. ती दिसायला तर सुंदर होतीच. पण तिचा स्वभाव फार प्रेमळ होता. आमचं लग्न झालं आणि आमचा संसार फार सुखाचा होता. मी बीएआरसीमध्ये नोकरीला होतो.

Maharashtra Times 16 Aug 2016, 12:59 am
>> यशवंत तुर्भेकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nastes ghari tu jevha
साथ दे तू मला...


माझं लग्न १४ मार्च १९७६ रोजी झालं. माझ्या जीवनात धमृबाई वैती ही​ माझी पत्नी म्हणून आली आणि धर्मुबाईचं संगीता तुर्भेकर म्हणून लागलं. ती दिसायला तर सुंदर होतीच. पण तिचा स्वभाव फार प्रेमळ होता. आमचं लग्न झालं आणि आमचा संसार फार सुखाचा होता. मी बीएआरसीमध्ये नोकरीला होतो. आम्ही एकत्र दिल्ली, आग्रा, मथुरा, कोलकाता, दार्जिलिंग, गंगटोक, नेपाळ, उत्तरप्रदेश, गोरखपूर, गोवा, अजिंठा लेणी अशा बऱ्याच ठिकाणी फिरलो. आम्हाला दोन मुलं. माझी परिसिथती बेताचीच होती. आमचा संसार सुखाचा चालला होता. माझ्या पत्नीचं १९९२मध्ये पहिलं बायपासचं ऑपरेशन झालं. पण माझ्या पत्नीने कधीच विश्रांती घेतली नाही. त्यानंतर २०१४मध्ये पुन्हा बायपासचं ऑपरेशन झालं. पण ते ऑपरेशन काळजीपूर्वक केलं गेलं नाही. त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. सर्वांकरता कष्ट केले. पण दोन्ही मुलांनी-सुनांनी तिला सुख दिलं नाही. कोणीच तिला चांगली वागणूक दिली नाही. जानेवारीला माझ्या पत्नीचं एकाएकी निधन झालं आणि माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

गेली ३९ वर्षं तिने माझ्याबरोबर संसार केला. तिची आठवण सतत येत राहाते. माझ्या मित्रांनी माझं फार सांत्वन केलं. गेली ३९ वर्षं आम्ही एकमेकांच्या दुःखात-सुखात समरस होतो. कधीच आम्ही दूर गेलो नाही. माझी संगीता लक्ष्मी होती, अन्नपूर्णा होती. तिचा पुर्नजन्म होऊन माझ्या जन्मोजन्मी तिची साथ लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज