अ‍ॅपशहर

आनंद पोटात माझ्या मावेना

आज ही मला तो दिवस आठवतो म्हणजे माझ्या पहिल्या पगाराचा. माझे कॉलेजचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. मी आणि माझ्या मैत्रिणीने बी.एड आणि एम. एस. डब्ल्यूचा फॉर्म भरला होता. शिकत असतानाच असं नेहमी वाटायचं की,आपणही एखादी छोटी नोकरी किंवा काम करावं.

Maharashtra Times 18 Nov 2016, 12:41 am
दीपाली तिळवणकर, ऐरोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dipali tilwankar sharing her memories of first salary
आनंद पोटात माझ्या मावेना

आज ही मला तो दिवस आठवतो म्हणजे माझ्या पहिल्या पगाराचा. माझे कॉलेजचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. मी आणि माझ्या मैत्रिणीने बी.एड आणि एम. एस. डब्ल्यूचा फॉर्म भरला होता. शिकत असतानाच असं नेहमी वाटायचं की,आपणही एखादी छोटी नोकरी किंवा काम करावं. जेणेकरुन नवीन काही शिकायला मिळेल, अनुभव घेता येईल. बाहेरच्या जगाची नव्याने ओळख होईल. या स्पर्धेच्या जगात येणाऱ्या समस्या, संकटे, त्यासाठीची तडजोड हे सर्व काही आपल्याला कामाच्या निमित्ताने कळेल. झालं देखील तसंच. ते म्हणतात ना तुमची चांगलं काही काम करण्याची जिद्द ,प्रयत्न आणि देवाचे आशीर्वाद असल्यावर मार्ग नक्कीच सापडतो.
मुळातच माझा स्वभाव बोलका असल्यामुळे मला त्याच फायदा झाला. माझ्या सरांनी मला एका शैक्षणिक उपक्रमाच्या ठिकाणाचा पत्ता दिला. मग मीही त्या ठिकाणी जाऊन त्या उपक्रमाची सर्व माहिती, चौकशी करुन घेतली. दोनच दिवसात त्यांनी मला काम करण्याची संधी दिली. मग मीही आई-वडिलांचा आणि देवाचा आशीर्वाद घेऊन कामाचा श्री गणेशा केला. सुरुवातीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला. पण प्रयत्न चालू ठेवले.
माझ्या बोलक्या स्वभावाचा मी फायदा करुन घेतला. सर्वांना अगदी सोप्या भाषेत त्या उपक्रमाची माहिती देताना त्याचं महत्त्वही पटवून देत होते. हे करत असताना खूप आनंद, समाधान आणि शिकायलाही मिळालं. त्यामुळे कधी एक महिना उलटला कळलंच नाही. एका महिन्यात आपण जेवढं काम करु त्याप्रमाणे वेतन मिळणार या नियमाप्रमाणे मला माझ्या कामाचे २५० रुपये मिळाले. ते हातात घेताना एवढा आनंद झाला होता की मी तो शब्दात वर्णन करु शकत नव्हते. मी लगेचच घरी जाऊन ही बातमी माझ्या आईला सांगितली. तिचे आणि देवाचे आशीर्वाद घेतले. आजही आईच्या डोळ्यातील ते भाव आठवतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज