अ‍ॅपशहर

जपते गाण्याचा वारसा

छंद म्हणजे नाद, आवड, रुची असे अनेक अर्थ, पण माझा छंद म्हणजे गाणं होय. माझं लहानपण खेडेगावात गेलं. सात वर्षांपूर्वी तिथं वीज नसल्याने आधुनिक साधने, माध्यम, उपकरणं नव्हती. माझ्या गाण्याची तहान मी अनेक प्रकारे भागवत होते. दिवाळीच्या सुट्टीत व मे महिन्यात माहेरवाशीणी व सासरवाशिणी शहरातून येत. या स्वतः नवीन गाणी म्हणून मला व माझ्या सर्व मैत्रिणींना गाण्याची मेजवानी द्यायच्या.

Maharashtra Times 7 Sep 2017, 12:17 am
रजनी भागवत, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम like to sing
जपते गाण्याचा वारसा


छंद म्हणजे नाद, आवड, रुची असे अनेक अर्थ, पण माझा छंद म्हणजे गाणं होय. माझं लहानपण खेडेगावात गेलं. सात वर्षांपूर्वी तिथं वीज नसल्याने आधुनिक साधने, माध्यम, उपकरणं नव्हती. माझ्या गाण्याची तहान मी अनेक प्रकारे भागवत होते. दिवाळीच्या सुट्टीत व मे महिन्यात माहेरवाशीणी व सासरवाशिणी शहरातून येत. या स्वतः नवीन गाणी म्हणून मला व माझ्या सर्व मैत्रिणींना गाण्याची मेजवानी द्यायच्या. मला लहानपणापासून गाण्याची आवड होती. 'गाता गळा, शिपंता मळा', असंच काहीसं माझं होतं. मंगळागौरी, गणपती, डोहाळेजेवण, लग्न, मुंजी सर्व ठिकाणी गाण्यासाठी माझी उपस्थिती असायची. माझी गाणी गावातील महिला मंडळ प्रेमाने, कौतुकाने ऐकत असत व मला शाबासकी मिळत होती.
गाण्याचा वारसा मला आईकडून म्हणजेच माझ्या आजोळकडून मिळाला. माझे भाऊ, मामे बहिणी एकत्र आलो की, झोपाळ्यावर बसून अंताक्षरी खेळायचो. निरनिराळी गाणी म्हणून मनमुराद आनंद घेत होतो. शाळेची प्रार्थना माझ्याशिवाय होत नसे. तसंच शाळेतील काही कार्यक्रमात माझा पहिला सहभाग असे. गावात गाण्याची काही सोय नसल्याने दुधाची तहान ताकावर भागवून मी खुशीत होते. कोणी गाणं म्हण असं सांगितल्यावर आढेवेढे न घेता एकदा आ सुरू झाला की अर्धा तास निश्चित! निरनिराळ्या गाण्याचा शोध घेता-घेता मी आलापसुध्दा घेऊ लागले. मी शिक्षिका झाल्यावर कोणत्याही शाळेत सामुदायिक गाण्याच्या कार्यक्रमाला मी हमखास जात असे. आता माझं वय ८० वर्षं आहे. वसईमध्ये अनेक ठिकाणी भजनी मंडळाच्या स्पर्धा होतात. त्या निमित्ताने आम्हा आजी मंडळींना छान व्यासपीठ मिळतं. यंग स्टार या संस्थेत लहानांपासून मोठी मंडळीही आपली कला सादर करतात. यंदा आमच्या भजनी मंडळाला पहिला नंबर मिळाला. अशारितीने मी माझा गाण्याचा छंद जोपासला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज