अ‍ॅपशहर

गप्पा मारण्याचं हक्काचं स्थान

मी ८० वर्षांची आहे. १९६० साली अंधेरीला मी एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला लागले. वैयक्तिक कारणामुळे १९९२ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. लग्न झाल्यापासून बऱ्याच जागा बदलल्या, परंतु प्रपंच व्यापामुळे मी माझ्या जागेचा शोध घेतला नाही. २००५ साली वसईवरून नवी मुंबईतील घणसोलीमध्ये नवीन घरात प्रवेश केला आणि त्याच वेळी मला जाणीव झाली की, मला पाहिजे असलेली माझी जागा मला मिळाली. मी राहत असलेला ब्लॉक पूर्व-पश्चिम वन बीएचके आहे.

Maharashtra Times 18 Jul 2017, 12:38 am
मंदाकिनी पोतनीस, घणसोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a happy space
गप्पा मारण्याचं हक्काचं स्थान

मी ८० वर्षांची आहे. १९६० साली अंधेरीला मी एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला लागले. वैयक्तिक कारणामुळे १९९२ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. लग्न झाल्यापासून बऱ्याच जागा बदलल्या, परंतु प्रपंच व्यापामुळे मी माझ्या जागेचा शोध घेतला नाही. २००५ साली वसईवरून नवी मुंबईतील घणसोलीमध्ये नवीन घरात प्रवेश केला आणि त्याच वेळी मला जाणीव झाली की, मला पाहिजे असलेली माझी जागा मला मिळाली. मी राहत असलेला ब्लॉक पूर्व-पश्चिम वन बीएचके आहे.
घरात वेताचं फर्निचर आहे. ज्या ठिकाणी कोच ठेवला आहे, त्या कोचाचा कोपरा माझी आवडती जागा आहे. सकाळी उठल्यावर ५-१० मिनिटे त्या जागेवर बसून बाहेरचा देखावा बघत, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत माझा दिवस सुरू होतो. बाल्कनीला ग्रिल लावलेलं असून, तिथे सोनटक्का, लीली, ब्रह्मकमळ, तुळस, झेंडू वगैरे झाडांच्या कुंड्या आहेत. ग्रिलवर पक्ष्यांसाठी पाण्याचं भांडं ठेवलेलं असून कट्ट्यावर पोहे, शेव, तांदूळ वगैरे ठेवलेलं असतं. त्यामुळे तिथं चिमण्या, कावळे, कबुतरे, साळुंक्या येऊन बसतात.
कोचावर बसून माझा सकाळचा चहा, पेपर वाचनचा कार्यक्रम चालतो. इथे बसूनच भाजी चिरणं, टीव्ही बघणं तसंच दुपारचं जेवणही इथेच होतं. माझी अत्यंत आवडीची गोष्ट म्हणजे माझं लिखाण आणि वाचन याच जागेवर होतं. प्रवासवर्णन लिहिण्याचा मला छंद आहे. लग्नानंतर मी या गोष्टींना इच्छा असूनही वेळ देऊ शकले नाही. परंतु आता मात्र मी मिळालेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करत आहे. वयोमानामुळे आता मात्र प्रवास करणं झेपत नाही. मला जरी इतिहासाची आवड असली तरी माझं चौफेर वाचन मी याच ठिकाणी बसून करते. नातेवाईक आल्यानंतर याच जागेवर बसून गप्पा-विनोद चालतात. परंतु काही वेळेला या जागी एकटी निवांत बसलेली असताना गतकाळाच्या घडलेल्या चांगल्या-वाईट घटना मनामध्ये पिंगा घालतात व मन भरून येतं. असा हा माझा हक्काचा तसंच आवडीचा माझा कोपरा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज