अ‍ॅपशहर

जगावेगळी असेल सुंदर!

'ते माझे घर, ते माझे घर! जगा वेगळे असेल सुंदर!' या गाण्याच्या ओळी, मला वाटतं की फक्त माझ्या घरासाठीच लिहिल्या असाव्यात. संपूर्ण घरच ही माझी मर्मबंधातली ठेव आहे! पण तरीदेखील आमच्या घराचा हॉल आणि त्याला लागून असलेली बाल्कनी ही माझी घरातील आवडती जागा! आमचं घर पूर्व-पश्चिम आहे. प्रत्येक खोलीला दोन मोठ्या खिडक्या आणि दारं आहेत. त्यामुळे वारा-उजेड भरपूर!

Maharashtra Times 20 Jan 2017, 12:01 am
गंधवती तांबे, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lovely greenary
जगावेगळी असेल सुंदर!

'ते माझे घर, ते माझे घर! जगा वेगळे असेल सुंदर!' या गाण्याच्या ओळी, मला वाटतं की फक्त माझ्या घरासाठीच लिहिल्या असाव्यात. संपूर्ण घरच ही माझी मर्मबंधातली ठेव आहे! पण तरीदेखील आमच्या घराचा हॉल आणि त्याला लागून असलेली बाल्कनी ही माझी घरातील आवडती जागा! आमचं घर पूर्व-पश्चिम आहे. प्रत्येक खोलीला दोन मोठ्या खिडक्या आणि दारं आहेत. त्यामुळे वारा-उजेड भरपूर!
आम्ही बाल्कनीत कुड्यांमध्ये झाडं लावून छान बाग केली आहे. अश्विन महिन्यात गॅलरीत बसून हवेचा सुगंध घ्यायला, सकाळचा मंद वारा अनुभवायला मला खूप आवडतं. पक्ष्यांचे आवाज, मंद-थंड वारा अनुभवत चहाचे घोट घेताना अगदी प्रसन्न वाटतं. हॉलच्या खिडकीतून रंगाची उधळण करणारा गुलमोहर दिसतो. बाजूलाच आंबा, फुलांनी बहरलेलं झाड यांचा ऋतुनुसार सुगंध येतो. शहरात राहूनसुद्धा वृक्षराजींनी वेढलेलं माझं घर आहे.
हॉलमधील छोटा दिवाण आणि आरामखुर्ची ही माझी लाडकी ठिकाणं. दुपारचं वाचन मी यावर पडूनच करते. आरामखुर्ची तर माझी आरामदायिनी सखीच आहे. तिच्यात बसून लेखन, वाचन, विणकाम करताना, भाज्या निवडताना, टीव्ही बघताना, माझी एकेकाळी त्रास देणारी पाठदुखी बंद झाली. आमच्या हॉलची सजावट अगदी साधी पण उत्तम रंगसंगती साधणारी आहे. फिक्कट गुलाबी वॉलपेपर आणि त्याला साजेसे पडदे! सगळीकडे अमेरिकेहून आणलेल्या फुलांची सजावट आहे.
मी सर्वकाळ गृहिणी! त्यामुळे माझ्या घराशी निगडीत अनंत आठवणी आहेत. त्याने मला सुख-समाधान आणि आधार दिला आहे. आनंदाचे, दुःखाचे, काळजीचे क्षण पाहिले तर काहीक्षणी आश्वासक आधार दिला आहे. आजपर्यंत कालच्यापेक्षा आजचा दिवस चांगला ठरला आहे, ही वास्तू देवतेची कृपा!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज