अ‍ॅपशहर

मज आवडे हा 'आम्रवृक्ष'

निसर्ग आणि माणूस यांचा फार जवळचा संबंध असतो. माणूस काय पशुपक्षी पण त्याला अपवाद नसतात. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ का होईना एकांत मिळावा असं वाटतं. घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एक बाग आहे, त्याचे नाव 'मनोरंजन गार्डन'.

Maharashtra Times 21 Feb 2017, 12:42 am
आशालता दाभोळकर, लालबाग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mango tree
मज आवडे हा 'आम्रवृक्ष'


निसर्ग आणि माणूस यांचा फार जवळचा संबंध असतो. माणूस काय पशुपक्षी पण त्याला अपवाद नसतात. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ का होईना एकांत मिळावा असं वाटतं. घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एक बाग आहे, त्याचे नाव 'मनोरंजन गार्डन'. गार्डनच्या कडेलगत एक मोठा डेरेदार आम्रवृक्ष आहे. त्याच्या भोवती छान सिमेंटचा कट्टा बांधला आहे. कोवळे ऊन अंगावर घेऊन चालून झाले की, मी झाडाखाली येऊन बसते.
आजुबाजूला शांत वातावरण असते. ही जागा माझ्या अत्यंत आवडीची आहे. सध्या आंब्याला मोहोर भरपूर आलाय. त्याचा सुगंध प्रत्येक झुळूकी सोबत येतो. पक्ष्यांचा किलबीलाट चालू असतो. मध्येच कोकीळा तान मारत असते. कबूतरांचं गुटरगू चालू असतं. इथे खारीपण भरपूर आहेत, त्यांची पळापळ सुरु असते. रंगीत फुलं फुललेली असतात. या वातावरणात मी प्राणायाम करते. थोडं वाचनही करते. देवाने आपल्याला निसर्ग भरभरून दिलाय, त्याचं स्मरण करते. ही सकाळची वेळ माझी एकटीची असते. दिवसभर लागणारी ऊर्जा ही मला या 'आम्रवृक्षा' खाली मिळते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज