अ‍ॅपशहर

​ मन प्रसन्न करणारा कोपरा

माझ्या घरातील माझी आवडती जागा म्हणजे माझा देवघराचा कोपरा. मुंबईसारख्या शहरात एक देवघरासाठी राखीव खोली असणं फार कठीण आहे. त्यामुळे हा जो देवघराचा कोपरा माझी आवडती जागा आहे. मी सी.ए आहे आणि एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यामुळे माझा अर्धा वेळ प्रवासात, ऑफिसमध्ये आणि उरलेला वेळ इंटरनेट वर जातो.

Maharashtra Times 26 Apr 2017, 12:01 am
मनीष सावळकर, कांदिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my fav corner
​ मन प्रसन्न करणारा कोपरा


माझ्या घरातील माझी आवडती जागा म्हणजे माझा देवघराचा कोपरा. मुंबईसारख्या शहरात एक देवघरासाठी राखीव खोली असणं फार कठीण आहे. त्यामुळे हा जो देवघराचा कोपरा माझी आवडती जागा आहे. मी सी.ए आहे आणि एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यामुळे माझा अर्धा वेळ प्रवासात, ऑफिसमध्ये आणि उरलेला वेळ इंटरनेट वर जातो. खरं सांगतो, या सर्व गोष्टींना बाजूला सारुन मी जेव्हा देवाघराच्या कोपऱ्यात माझा वेळ काढतो तेव्हा फार सकारत्म विचार येतो व नवीन उमेद मिळते. दिवसातून मुख्यतः सकाळी देवापुढे डोळे बंद करून मन आणि विचार शांत करून जेव्हा मी पंधरा मिनिटं उभा राहतो तेव्हा तो दिवस फार सुंदर जातो, मनातली सकारत्म दृष्टिकोन वाढतो. कधी-कधी माझ्या ऑफिसच्या दौऱ्यामुळे मला वेळ देता येत नाही.
आमच्या देवघरात मोजून चार देव आहेत पण महत्त्वाचं हे की, त्या कोपरात गेलो आणि उदबत्ती लावली की, फार प्रसन वाटतं. देवळात जाण्यापेक्षा या चार देवांपुढे डोळे मिटून चिंतन करायला मला खूप आवडतं आणि मनाला पटतं. मला वाटतं की, प्रत्येकाच्या मनातील जो 'मी' पणा आहे तो जर कमी करायचा असेल तर हा कोपरा किंवा देवाची जागा हे यावरचा उत्तम उपाय आहे. माझी तीन वर्षांची मुलगी जेव्हा मला पाहते ती ही माझी नकल करत देवा पुढे उभी राहते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज