अ‍ॅपशहर

रमते शब्दांच्या दुनियेत

छंद सगळ्यांनाच असतो. प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. माझा छंद वाचन आणि लेखन हा आहे. मी रिकाम्या वेळात माझं लेखन करते. विषय मिळाला की, लगेच लिखाण करते. मी स्वर, व्यजन, बाराखडी, समानार्थी, विरुद्ध अर्थी, लिंगबदल, वचनबदल, पशु-पक्षी, प्राणी, वाहने, रंग असे अकरा हजार शब्द लिहिले आहेत.

Maharashtra Times 21 Mar 2017, 12:06 am
लतिका देशमुख, बदलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम word power
रमते शब्दांच्या दुनियेत


छंद सगळ्यांनाच असतो. प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. माझा छंद वाचन आणि लेखन हा आहे. मी रिकाम्या वेळात माझं लेखन करते. विषय मिळाला की, लगेच लिखाण करते. मी स्वर, व्यजन, बाराखडी, समानार्थी, विरुद्ध अर्थी, लिंगबदल, वचनबदल, पशु-पक्षी, प्राणी, वाहने, रंग असे अकरा हजार शब्द लिहिले आहेत. विषय कोणताही असो लिहायचं ठरवलं की, छंद रिकामे बसू देत नाही.
माझं गेल्यावर्षी 'भाजी एक, प्रकार अनेक' हे रेसिपीचे पुस्तक प्रकाशित झाले आहेत. आतापर्यंत मी तीस लेख लिहिले आहेत. त्या बरोबरच मी समाजोपयोगी कामं ही करते. आमचे महिला मंडळ ही आहे. मंडळात अनेक कार्यक्रम होतात. मी छंदात एवढी रमते. एक-दोन तास निघून गेले तरी कळत नाही. मी छंद सगळी कामं करून जोपासते. माझा छंद मला काही केल्या स्वस्थ बसू देत नाही. मी न कटांळता माझा छंद पुरा करते. कोणीही विचारलं की, अमुक-तमुकची रेसिपी काय आहे? मी लगेच लिहून देते. एवढा लिखाणाचा छंद मला आहे. माझे पतीही मला पाठिंबा देतात. पाचशे रेसिपी स्वत: लिहिल्या आहेत आणि ते पुस्तकही मी छापलं आहे. आता शब्द खजिना प्रकाशित करणार आहे. छंदात मी खूप आनंदी आहे. मी लिहित रहाणार आहे. छंदात रमायला होतं. त्यामुळे वेळ मजेत जातो.
माझा छंद पुरा करण्यासाठी माझी एक जागा आहे. ती म्हणजे माझ्या घराची बाल्कनी. तिथं बसून मी लिखाण करते. तिथून डोंगरही छान दिसतो. सकाळचे कोवळं ऊनही येतं. धुकं छान दिसतं. पावसात तर काय सुंदर देखावा दिसतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज