अ‍ॅपशहर

शब्द, भावनांचा काव्यरूपी संग्रह

या ओळींप्रमाणे एखादी कथा किंवा एखादी भावना नेहमी महत्त्वपूर्ण असते असं मला वाटतं. म्हणूनच खजिना म्हणून मी सुंदर वस्तू न जमवता माझी भावनाच जणू जाणते आणि ती जपते. माझा खजिना म्हणजे माझ्या कविता. आनंद, दुःख, प्रेम, विरोध आणि अशा असंख्य भावना काही ओळींमधून व्यक्त करता येतात, ती कविता!

Maharashtra Times 15 Nov 2016, 12:10 am
मिताली कुलकर्णी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my treasure
शब्द, भावनांचा काव्यरूपी संग्रह


वस्तू नाही

त्या मागची गोष्ट महत्त्वाची,

शब्द नाही

त्या मागची भावना महत्त्वाची

या ओळींप्रमाणे एखादी कथा किंवा एखादी भावना नेहमी महत्त्वपूर्ण असते असं मला वाटतं. म्हणूनच खजिना म्हणून मी सुंदर वस्तू न जमवता माझी भावनाच जणू जाणते आणि ती जपते. माझा खजिना म्हणजे माझ्या कविता. आनंद, दुःख, प्रेम, विरोध आणि अशा असंख्य भावना काही ओळींमधून व्यक्त करता येतात, ती कविता!

सुरुवात सगळ्यांप्रमाणे शाळेतच. निबंध लिहिताना त्यात स्वरचित चारोळ्या घालाव्याशा वाटल्या. मग ओळी बनवायचं कुतूहल वाटू लागलं. अशा प्रकारे चारोळ्यांची लांब कविता कधी झाली कळलंच नाही. आयुष्य असो वा नाती, शाळा असो वा घरटी असं रोजच्या सवयीतले विषय वापरुन मी कविता करत गेले. सर्वात मुख्य म्हणजे मी कविता स्वतःसाठी आणि इतरांना आनंद मिळावा यासाठी लिहिते. त्याचमुळे त्यात भाषेचं आणि शब्दांचं बंधन नसतं. माझे विचार व्यक्त झाल्यामुळे कोणाला छान वाटत असेल तर असा खजिना काय वाईट!

मला कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहन माझ्या आई-वडिलांकडून मिळालं. माझ्या स्वरचित ओळींना त्यांच्याकडून दाद मिळालीच. पण मी छान प्रकारे लिहिते असं माझे वडील नेहमी सांगतात. याशिवाय मी शाळेत असताना माझ्या मराठी क्लासच्या काकूंनी मला नवी उमेद दिली. ‘तू कविता छान करतेस. लिहीत रहा’, असे त्यांचे शब्द मला प्रेरणा देत आले. कवितेची कला आणि कलेचा खजिना अशी ‘क-ख’ची बाराखडी आज प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. हा खजिना कधीच हरवणार नाही आणि वाढत जाईल अशी मी आशा बाळगते. शेवटी माझ्या कवितेच्या ओळी…

आयुष्य एक सुंदर प्रवास,

इथे आपल्यांचा सहवास

आयुष्यात जरी

आपलेच असलो आपण,

तरी नात्यांची असावी

नेहमीच आठवण

राग त्रागे सोडावेत मागे,

कारण असतात

सुखदुःखाचे समान धागे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज