अ‍ॅपशहर

हुशार चिंटू

त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती. घरोघरी पितरांचं श्राद्ध होतं. चिंटूच्या आईने वरणभात, दोन प्रकारच्या भाज्या, चटणी, कोशिंबीर, खीर, पुऱ्या, वडे असा साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. त्याच्या घरी आत्या, तिची मुलं, काका, काकू आणि त्यांची मुलंही जेवायला आली होती.

Maharashtra Times 18 Oct 2016, 12:29 am
शैला गडकरी, कांदिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम story for children by shaila gadkari
हुशार चिंटू

त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती. घरोघरी पितरांचं श्राद्ध होतं. चिंटूच्या आईने वरणभात, दोन प्रकारच्या भाज्या, चटणी, कोशिंबीर, खीर, पुऱ्या, वडे असा साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. त्याच्या घरी आत्या, तिची मुलं, काका, काकू आणि त्यांची मुलंही जेवायला आली होती. चिंटूने आईला विचारले, 'आई आज आपल्याकडे काय आहे?'. त्यावर आई म्हणाली, 'बाळा तुझे आजी आजोबा देवाघरी गेले ना, त्यांचं स्मरण करुन श्रद्धेने आपण त्यांचं आज श्राद्ध करणार आहोत'. चिंटूच्या आईने सर्व जेवण केळीच्या पानावर वाढलं आणि चिंटूचे बाबा आणि काका ते पान घेऊन अंगणात गेले. त्यांनी ते पान कट्ट्यावर ठेवलं आणि नमस्कार करुन कावळा येण्याची वाट पाहात बराच वेळ तिथं उभे राहिले. बराच वेळ झाला तरी कावळा आला नाही, शेवटी ते पान तसंच ठेऊन घरात आले. चिंटू खिडकीतून बघत होता. अंगणाच्या बाहेर झाडाखाली एक वृद्ध भिकारी बसला होता आणि प्रत्येक जाणाऱ्या-येणाऱ्या वाटसरुला विनवणी करत होता. 'बाबा म्हाताऱ्याला काहीतरी खायला द्या हो. दोन दिवसाचा उपाशी आहे मी. काहीतरी द्या, देव तुमचं भलं करेल'. पण प्रत्येकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निघून जात होता. चिंटू पटकन धावत अंगणात गेला. त्याने ते पान उचललं आणि त्या भिकाऱ्याच्या समोर ठेवलं. त्याने त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला नमस्कार केला आणि म्हणाला, 'आजोबा जेवा'. त्या भिकाऱ्याला खूप आनंद झाला. त्याने चिंटूला तोंड भरुन आशीर्वाद दिला. चिंटूने आईला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून त्याचे काका म्हणाले, 'शाब्बास बेटा, तू जे केलेस ते अगदी योग्य होतं. त्या भुकेल्या भिकाऱ्याला तू खाऊ घातलंस. जे आम्हाला सुचलं नाही ते तू केलंस'.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज