अ‍ॅपशहर

दाणा आणि पाणी

एक होती चिऊ ताई. भर दुपारी सूर्य माथ्यावर आलेला असताना तिला तहान लागली. पण या चिऊची होती एक समस्या. तिच्या एका पंखाला दुखापत झाल्यामुळे तिला काही उडता येत नव्हतं. चिऊ ताई एकटीच राहत असे. नक्की तहान कशी भागवायची या विवंचनेत असताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. काही विचारांनी ती इतकी भयभीत झाली की तिला आपला शेवट जवळ आला असंच वाटू लागलं.

Maharashtra Times 22 Sep 2016, 12:12 am
हेरंब सुखटणकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tell a tale by herambh sukhtankar
दाणा आणि पाणी

एक होती चिऊ ताई. भर दुपारी सूर्य माथ्यावर आलेला असताना तिला तहान लागली. पण या चिऊची होती एक समस्या. तिच्या एका पंखाला दुखापत झाल्यामुळे तिला काही उडता येत नव्हतं. चिऊ ताई एकटीच राहत असे. नक्की तहान कशी भागवायची या विवंचनेत असताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. काही विचारांनी ती इतकी भयभीत झाली की तिला आपला शेवट जवळ आला असंच वाटू लागलं. चिऊताई बसलेल्या त्या चिकूच्या झाडावर नुकतीच फळं लागायला सुरुवात झाली होती. त्यामुळे चिकूचा गोड रस चाखायला अजून काही मुंग्यांची वर्दळ सुरु झाली नव्हती. अचानक चिऊताईच्या घरट्यात एक भला मोठा पानाचा द्रोण येऊन पडला. घाबरलेल्या चिऊताईची भीती अधिक बळावली. वरच्या फांदीवर पाहता तिला काही मुंग्या खाली येताना दिसल्या. आता या मुंग्या नक्की आपल्याला मारणार असा तिचा समज झाला. जसजशा त्या मुंग्या जवळ येऊ लागल्या तसं चिऊ ताईने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षण कोणतीच हालचाल न जाणवल्याने तिने हळूच एक डोळा उघडून पाहिलं तर मुंग्यांची एक लांबच लांब रांग एक एक पाण्याचा थेंब घेऊन येत होती आणि तो त्या पानाच्या द्रोणात रिता करत होती. पाहता पाहता तो द्रोण पाण्याने भरला आणि चिऊताईची तहान भागली. काही दिवसांपूर्वी याच मुंग्यांना अन्नाचा तुटवडा असताना नकळतपणे चिऊ ताईच्या चोचीतून काही गव्हाचे दाणे पडले होते. या नकळतपणे केलेल्या उपकाराची जाणीव त्या मुंग्यांनी राखली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज