अ‍ॅपशहर

​ अति तेथे माती

भाविका शाळेतून आली की जेवून भांडी घासण्याचं एकच काम आई तिला सांगत असे. आई भांड्यांचा टोपलं घासण्यासाठी बाहेर ठेवून भाविकाला भांडी घासण्यास सांगून ती मळ्यात काम करण्यास जाई. भांडी बाहेर ठेवल्यावर भाविका कधीच लगेच जात नसे. सर्व खरकटी भांडी टोपलीतून कावळा एक-एक करून बाहेर काढत असे.

Maharashtra Times 19 Jan 2017, 12:01 am
अमिता ठाकूर, उरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम your child using smartphone
​ अति तेथे माती


भाविका शाळेतून आली की जेवून भांडी घासण्याचं एकच काम आई तिला सांगत असे. आई भांड्यांचा टोपलं घासण्यासाठी बाहेर ठेवून भाविकाला भांडी घासण्यास सांगून ती मळ्यात काम करण्यास जाई. भांडी बाहेर ठेवल्यावर भाविका कधीच लगेच जात नसे. सर्व खरकटी भांडी टोपलीतून कावळा एक-एक करून बाहेर काढत असे. त्या भांड्यांचा आवाज झाला की भाविका हातातला मोबाइल घेऊन बाहेर येत असे. कावळ्याला हाकलवून भांडी घासण्यास सुरुवात करणार तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला की गप्पा सुरु. तिला भांडी घासण्याचा नेहमी कंटाळा येत असे. हे सर्व समोर बसलेला कावळा रोज पाहत असे, ती मोबाईलला तोंडाजवळ, कानाजवळ नेत असे बोलून झालं की खाली ठेवत असे. एक-दोन भांडी घासली की मोबाईल वाजायचा. परत ती मोठ्याने बोले, कानाला लावे आणि खाली ठेवे. तिला भांडी घासण्यास बराच वेळ लागे. कारण अर्धा वेळ मोबाइलवर बोलण्यात जाई.
एक दिवस बोलून झाल्यावर भाविकाने मोबाइल खाली ठेवला. तेवढयात कावळ्याने मोबाइल चोचीत उचलला आणि दूर घेऊन उडाला. त्याला वाटलं की काही तरी खाण्याची वस्तू आहे. कारण भाविका मोबाइल तोंडाजवळ न्यायची, कानाला लावायची आणि खाली ठेवायची हे कावळ्याने पाहिलं होतं. भाविकाने हातातलं भांडं कावळ्यावर भिरकावलं. मोबाइल घेऊन तो दूर उडाला. भाविकाला वाटलं, त्या कावळ्याच्या तोडांतून मोबाइल पडला असेल. म्हणून तिने खूप शोधला. पण मोबाइल सापडला नाही. भाविकाने संध्याकाळी आईला सर्व हकीकत सांगितली. हे ऐकताच आई खूप हसली आणि म्हणाली, 'आता नवीन मोबाइल मिळणार नाही. मी रोज सांगत होते. कामाकडे, अभ्यासाकडे लक्ष दे मोबाइल बाजूला ठेव. पण ऐकलं नाहीस. एखाद्या गोष्टीचा आतिरेक केला की असं घडतं'. आईच्या या बोलण्यावरुन भाविकाला तिची चूक उमगली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज