अ‍ॅपशहर

सखे गं साजणी ये ना

संगीतकाराने दिलेली उत्तम चाल, गीतकाराने लिहिलेलं सुंदर गीत, गायकाने आवाजाने दिलेला न्याय असा संगम झाला तर ते गाणं कोणाला आवडणार नाही? असंच एक गाणं माझ्याही मनातलं गाणं आहे. मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना.. जराशी सोडून जन रीत ये ना सखे ग साजणी ये ना..

Maharashtra Times 14 Jul 2016, 3:24 am
दीपक गुंडये, वरळी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम favourite song sakhe g sajani ye na
सखे गं साजणी ये ना


संगीतकाराने दिलेली उत्तम चाल, गीतकाराने लिहिलेलं सुंदर गीत, गायकाने आवाजाने दिलेला न्याय असा संगम झाला तर ते गाणं कोणाला आवडणार नाही? असंच एक गाणं माझ्याही मनातलं गाणं आहे.
मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजणी ये ना..
जराशी सोडून जन रीत ये ना सखे ग साजणी ये ना..
शांता शेळके यांनी लिहिलेलं, संगीतकार देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायक जयवंत कुलकर्णी यांच्या खट्याळ गायकीने नटलेलं हे एक मस्त गीत. कोणत्याही मराठी वाद्यवृंदात किंवा गाण्यांच्या भेंड्यांमध्ये आजही हे गाणं म्हटलं जातंच. वयाच्या १९ व्या वर्षी देवदत्त साबळे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. गायक जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील हे गाणं आजच्या पिढीतही लोकप्रिय आहे. मराठी गीतांच्या वाद्यवृंदांमध्येही हे नटखट गाणं आजही आवर्जून 'वन्स मोअर' मिळवते.
चांदणं रूपाचं आलंय भरा, मुखडा तुझा ग अति साजरा,
माझ्या शिवारी ये तू जरा, चारा घालीन तुज पाखरा,
माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहूनी...
गुलाबी गालात हासत ये ना...सखे ग साजणी ये ना.!
जराशी लाजत मुरडत ये ना...सखे ग साजणी ये ना.!
देवदत्त साबळे यांची ओळख एकेकाळी शाहीर साबळे यांचा मुलगा अशी होती. परंतु मेहनतीने त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. एक संगीतकार म्हणून निराळं स्थान निर्माण केलं. त्यांनी तब्बल ४५वर्षांपूर्वी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आजही रसिकांच्या ओठावर आहे.
आता कुठवर धीर मी धरू, काळीज करतंय बघ हूर हुरु,
सजणी नको ग माग फिरू, माझ्या सुरात सूर ये धरू,
माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहूनी...
बसंती वाऱ्यात तोऱ्यात ये ना...सखे ग साजणी ये ना.!
सुखाची उधळीत बरसात ये ना...सखे ग साजणी ये ना.!
प्रेयसीची आतुरतेने आणि अधीरतेने वाट पाहणारा प्रियकर तिला लवकर येण्यासाठी साद घालतोय. ती साद घालताना तिच्या येण्यात एक धुंदी असावी, नजाकत असावी ज्यामुळे तिच्या आगमनाने सुखाची उधळण होईल, बरसात होईल अशी अपेक्षा तो व्यक्त करतो आहे. गाण्यातल्या या भावनेशी श्रोतेही कुठेतरी एकरुप होतात. साहजिकच हे आपल्या मनातलं गाणं होऊन जातं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज