अ‍ॅपशहर

चांदण्यात फिरताना...

मराठी भावगीतांमधे रम्य, प्राकृतिक, निसर्ग-सृष्टीचा कल्पकतेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुरेल भावगीते ऐकताना त्यातल्या शब्द-रचनेवरुन वेगवेगळ्या ऋतूंचे रंग आणि पाना-फुलांची सुगंधी उधळण असणारे सुंदर निसर्गचित्र डोळ्यांसमोर उभे राहते. असंच एक तरल भावगीत 'चांदण्यात फिरताना' मला फार आवडतं.

Maharashtra Times 21 Nov 2016, 12:06 am
रीना महिंद्रकर, वाळकेश्वर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi movie song sung by asha bhosale
चांदण्यात फिरताना...

मराठी भावगीतांमधे रम्य, प्राकृतिक, निसर्ग-सृष्टीचा कल्पकतेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुरेल भावगीते ऐकताना त्यातल्या शब्द-रचनेवरुन वेगवेगळ्या ऋतूंचे रंग आणि पाना-फुलांची सुगंधी उधळण असणारे सुंदर निसर्गचित्र डोळ्यांसमोर उभे राहते. असंच एक तरल भावगीत 'चांदण्यात फिरताना' मला फार आवडतं. कवी सुरेश भट यांनी या भावगीतामधून आसमंतात पसरलेल्या तारकांच्या प्रकाशात प्रियकरासोबत निर्जन प्रदेशात येऊन पोहोचलेल्या नायिकेचे मंत्रमुग्ध करणारे मनोगत शब्दरुपात गुंफले आहे. केवळ निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या या भेटीत नायिका आपल्या प्रियकराला उद्देशून म्हणते,
चांदण्यात फिरताना
माझा धरलास हात
चांदण्यात फिरताना
माझा धरलास हात
सखया रे आवर ही
सावर ही चांदरात
निजलेल्या गावातून
आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे
पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया
पण सारे जाणतात
सांग कशी तुजविणाच
पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी
अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस,
स्पर्श तुझा पारिजात
जाऊ चल परत गडे,
जागले न घर अजून
पण माझी तुळस
तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र,
माझ्या हृदयी प्रभात
निद्रेच्या अधीन होऊन सामसूम झालेल्या गावा बाहेर एकटीच येऊन पोहचलेल्या नायिकेला असं जाणवतं की प्रियकरासोबत आपल्या भेटीचं गुपित उघड करणारे वाटेवरचे मिणमिणते दिवेसुद्धा फार मागे पडले आहेत. तरी रानावनातल्या अंधाराने व्यापलेल्या झाडांच्या पारंब्यांना आणि नाजूक पुष्पवेलींच्या सावलीला मात्र या भेटीचं रहस्य माहीत आहे. संगीत-रागातील मालकंसा सामान भासणाऱ्या प्रियकराच्या धीर-गंभीर श्वासांची लय आणि सुवासिक पारिजातासारख्या स्पर्शात हरवून गेलेल्या प्रेयसीचं मोहक मनोगत गायिका आशा भोसले यांच्या स्वरातून जाणवतं. जेष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे भावगीत श्रोत्यांना निसर्गाच्या पाऊलवाटेवरुन शीतल चांदण्यांच्या धुक्यात घेऊन जातं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज