अ‍ॅपशहर

आला आला वारा...

एखाद्याला गाणं वेगवेगळ्या कारणासाठी आवडू लागतं. कोणाला गाण्याचे बोल आवडतात, कोणाला गाण्याचं संगीत आवडतं, तर कोणाला ते गाणे चित्रित करण्यात आलेल्या प्रसंगामुळे आवडतं. भारतीय चित्रपट तर गाण्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. या चित्रपटात काही प्रसंगात गाणी चपखल बसवलीत. काही गाण्यांच्या निर्मितीमागे रंजक कहाण्या ऐकायला मिळतात. काही गाण्यांचे अर्थ लागतात, तर काही गाण्यांचे अर्थ समजावून घ्यावे लागतात.

Maharashtra Times 20 Dec 2016, 12:23 am
दीपक गुंडये, वरळी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi song ala ala wara
आला आला वारा...

एखाद्याला गाणं वेगवेगळ्या कारणासाठी आवडू लागतं. कोणाला गाण्याचे बोल आवडतात, कोणाला गाण्याचं संगीत आवडतं, तर कोणाला ते गाणे चित्रित करण्यात आलेल्या प्रसंगामुळे आवडतं. भारतीय चित्रपट तर गाण्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. या चित्रपटात काही प्रसंगात गाणी चपखल बसवलीत. काही गाण्यांच्या निर्मितीमागे रंजक कहाण्या ऐकायला मिळतात. काही गाण्यांचे अर्थ लागतात, तर काही गाण्यांचे अर्थ समजावून घ्यावे लागतात. असंच एक अर्थपूर्ण गाणं 'आला आला वारा संगे पावसाच्या धारा' हे 'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटातील आहे. गाण्याचे बोल पुढीलप्रमाणे
आला आला वारा
संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा
सया निघाल्या सासुरा...
नव्या नवतीचं बाई
लकाकतं रूप
माखलं ग ऊन
जणू हळदीचा लेप
ओठी हसू
पापणीत आसवांचा झरा...
या चित्रपटातील नायिका आणि तिच्या मैत्रिणी भाताच्या शेतात काम करत असतात. तेव्हा हे गाणं चित्रित केलंय. भाताची रोपं लावणी दरम्यान एका ठिकाणी वाढ झाल्यानंतर दुसरीकडे परत लावली जातात, जिथे ती रोपं वाढली जातात. याच भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलीची सुंदर उपमा गीतकार सुधीर मोघे यांनी दिलीय. ते म्हणतात, 'पाठवणी करा सया निघाल्या सासुरा'. अगोदर हे गाणं आवडलं होतंच पण गाण्यातील हा वेगळा अर्थ समजल्यानंतर ते जास्तच आवडू लागलं.
आजवरी यांना
किती जपलं जपलं
काळजाचं पानी
किती शिंपलं शिंपलं
चेतवून प्राण यांना
दिला ग उबारा...
येगळी माती
आता ग येगळी दुनिया
आभाळाची माया
बाई करील किमया
फुलंल बाई पावसानं
मुलुख ग सारा...
हे गीत सुधीर मोघे यांच्या लेखणीतून उतरलेलं असून त्याला संगीत दिलं आहे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी. आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गाणं पडद्यावर आशा काळे यांच्यावर चित्रीत झालं
आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज