अ‍ॅपशहर

मेरा प्यार वो है

विश्वजीत आणि शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या १९६६ सालच्या 'ये रात फिर ना आएगी' या सिनेमातलं 'मेरा प्यार वो है' हे महेंद्र कपूर यांच्या आवाजातील गाणं मला अतिशय भावतं.

Maharashtra Times 26 Jul 2016, 12:57 am
>> विवेक वालावलकर, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mera pyar woh hai
मेरा प्यार वो है


विश्वजीत आणि शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या १९६६ सालच्या 'ये रात फिर ना आएगी' या सिनेमातलं 'मेरा प्यार वो है' हे महेंद्र कपूर यांच्या आवाजातील गाणं मला अतिशय भावतं.

मेरा प्यार वो है के

मर कर भी तुमको

जुदा अपनी बाहों से होने ना देगा

मिली मुझको जन्नत तो,

जन्नत के बदले

खुदा से मेरी जान तुम्हें मांग लेगा

या सिनेमाच्या कथेचा विषय पूर्वजन्माशी संबंधित आहे. ओ. पी. नय्यर यांचं सदाबहार संगीत हे या सिनेमाचं मुख्य आकर्षण आहे. गीतकार एस. एच. बिहारी यांनी लिहिलेली सगळीच गाणी छान आहेत. या गाण्याला नय्यर यांनी लावलेली चाल आकर्षक आहे. त्यातील सतारीचा वापर चांगला आहे.

जमाना तो करवट बदलता रहेगा

नए जिंदगी के तराने बनेंगे

मिटेगी ना लेकिन मुहब्बत हमारी

मिटाने के सौ सौ बहाने बनेंगे

हकीकत हमेशा हकीकत रहेगी

कभी भी न इसका फसाना बनेगा

माझं तुझ्यावरचं प्रेम हे मृत्यूनंतरही तुला माझ्या बाहुपाशापासून दूर होऊ देणार नाही. मला स्वर्गात जागा मिळाली तरी, माझ्या प्रियतमे, त्या बदल्यात मी परमेश्वराकडून तुलाच मागून घेईन. काळ आपली कूस बदलतच राहणार आहे आणि जीवनाचा नवा राग आळवला जाणार आहे. तरीही आपल्या प्रेमाची कधीही इतिश्री होणार नाही.

तुम्हें छीन ले मेरी बाहों से कोई

मेरा प्यार यूं बेसहारा नहीं है

तुम्हारा बदन चांदनी आके छू ले

मेरे दिल को ये भी गवारा नहीं है

खुदा भी अगर तुमसे आके मिले तो तुम्हारी कसम है मेरा दिल जलेगा

तुला माझ्या बाहुपाशातून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. इतकं माझं प्रेम निराधार नाही. चांदण्यानं तुझ्या शरीराला स्पर्श केला तरी माझ्या मनाला ते पटणार नाही. परमेश्वर जरी येऊन तुला भेटला तरी, तुझी शपथ, माझं मन मत्सरानं जळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज