अ‍ॅपशहर

रुप तेरा ऐसा दर्पण में ना समाय

, 'एक बार मुस्कुरा दो' या चित्रपटातील गाणं मला आवडतं

Maharashtra Times 5 Jul 2016, 5:00 am
माझं आवडतं गाणं आहे, 'एक बार मुस्कुरा दो' या चित्रपटातील. गीतकार इंदिवर यांनी लिहिलेलं आणि संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी संगीतबध्द केलेलं. हे गाणं जॉय मुखर्जी व तनुजावर चित्रित झालेलं आहे. कवीने या गाण्यातून स्त्रीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम song from ek bar muskura do movie
रुप तेरा ऐसा दर्पण में ना समाय

रूप तेरा ऐसा दर्पण में ना समाय
खुशबू तेरे तन कि मधुबन में ना समाय
ओ मुझे खुशी मिली इतनी, के मन में ना समाय
पलक बंद करलूं कहीं छलक ही ना जाय
इंदिवरच्या या शब्दांना सुरेख चाल देऊन संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी किशोरकुमारकडून हे गीत असं काही मस्त गाऊन घेतलंय की त्याला तोडच नाही. संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी पुढच्या अंतऱ्याची चाल बदलण्याचीही किमया उत्तमरित्या साधली आहे.
मीत मेरा छीन लिया तूने छब दिखाके
सदा उसे रखना पलकों पे तू बिठाके
इतना सुख देना जीवन में ना समाय
यूं रस बरसाना आंगन में न समाय
असं म्हणत चित्रपटाचा नायक नायिकेला म्हणतो, एक बार मुस्कुरा दो! या गाण्याचं वैशिष्ठ म्हणजे जॉय मुखर्जीला नेहमीच रफी साहेबांनी आवाज दिला आहे. परंतु, इथे संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी किशोरकुमार यांच्या आवाजाचा आग्रह धरला. आणि 'एक बार मुस्कुरा दो'ची (एक गाणं वगळता) सर्व गाणी किशोरकुमार यांच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केली. 'रुप तेरा ऐसा दपर्ण में ना समाय' हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होते. माझ्या मनाला भावणारं हे गाणं मला खूप आवडतं. हे गाणं आजही ऐकलं की माझ मन टवटवीत होतं. आपल्या जीवनात गाणी, संगीत नसतं तर ते जीवन बेसूरं झालं असतं. माझ्या मनाचा आणि या गाण्याचा सूर जुळला आहे. म्हणूनच हे गाणं माझ्या मनातलं गाणं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज