अ‍ॅपशहर

मांग के साथ तुम्हारा...

बी. आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित 'नया दौर' हा गाजलेला चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला. सुरुवातीला दिलीपजी हा रोल करावयास राजी नव्हते. शेवटी अशोककुमार यांनी त्यांची समजूत काढली आणि ते तयार झाले.

Maharashtra Times 18 Nov 2016, 12:46 am
शशी आचरेकर, लालबाग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम song from hindi movie naya dour
मांग के साथ तुम्हारा...

बी. आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित 'नया दौर' हा गाजलेला चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला. सुरुवातीला दिलीपजी हा रोल करावयास राजी नव्हते. शेवटी अशोककुमार यांनी त्यांची समजूत काढली आणि ते तयार झाले. वैजयंतीमाला यांना ही या चित्रपटात रोल मिळाला. जीवन, चांद उस्मानी, राधाकिशन, लीला चिटणीस, नासिर हूसेन आणि जॉनी वॉकर यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या. ओ. पी. नय्यर यांचं बहारदार संगीत या चित्रपटाला होतं. 'ये देश है वीर जवानोंका', 'उडी जब जब झूल्फे तेरी', 'आना है तो आ', 'रेशमी सलवार कुर्ता जालीका', 'साथी हाथ बढाना', 'मैं बंबईका बाबू', 'ये देंगे तो क्या देंगे' ही सर्वच गाणी झकास होती.
मांग के साथ तुम्हारा मैंने,
मांग लिया संसार तुम्हारा
दिल कहे दिलदार मिला,
हम कहें हमें प्यार मिला
प्यार मिला हमें यार मिला,
एक नया संसार मिला
आस मिली अरमान मिला
जीने का सामान मिला
मिल गया एक सहारा,
मांग के साथ तुम्हारा ...
दिल जवा और रुत हंसीं,
चल यूही चल दें कहीं
तू चाहे ले चल कहीं,
तुझ पे है मुझको यकीं
जान भी तू है दिल भी तू ही
राह भी तू मंजिल भी तू ही
और तू ही आस का तारा,
मांग के साथ तुम्हारा...
हे गाणं माझ्या आवडीचं गाणं आहे. जे दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रीत झालेलं असून ते रफीसाहेब आणि आशाताई यांनी गायलेलं आहे. हे गाणं त्याकाळी घरोघरी, गल्लोगल्ली वाजवलं जात होतं. अभिनय सम्राट दिलीपकुमार यांची फिल्मफेअर विजेती भन्नाट भूमिका आणि त्यांना वैजयंती, अजित यांनी दिलेली सुरेख साथ ही चित्रपटाची वैशिष्ट्यं आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज