अ‍ॅपशहर

प्रेमाची परिभाषा

प्रेम... एक छोटासा शब्द. पण किती महत्त्व आहे या शब्दाला! निसर्ग नियमाप्रमाणे माणूस प्रेमात पडतो. काहींना प्रेमाचं सुख मिळतं तर काहींना प्रेमभंगाचा चटका. प्रेमात माणूस घडतो तर कधी बिघडतो. प्रेम ही हृदयातली सुंदर भावना असते. कुणाला कळलेली, कुणाला न कळलेली.

Maharashtra Times 24 Oct 2016, 12:39 am
नविन मोरे, रायगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम song from marathi movie premachi gosht
प्रेमाची परिभाषा

प्रेम... एक छोटासा शब्द. पण किती महत्त्व आहे या शब्दाला! निसर्ग नियमाप्रमाणे माणूस प्रेमात पडतो. काहींना प्रेमाचं सुख मिळतं तर काहींना प्रेमभंगाचा चटका. प्रेमात माणूस घडतो तर कधी बिघडतो. प्रेम ही हृदयातली सुंदर भावना असते. कुणाला कळलेली, कुणाला न कळलेली. कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली तर कुणी आयुष्यभर लपवलेली. प्रेम म्हणजे दोन जीवांना जोडणारा एक नाजूक धागा असतो. प्रेमाची नेमकी परिभाषा शोधताना माझ्या मनात मात्र हे एकच प्रेमगीत मनात रुंजी घालतं.
ओल्या सांजवेळी
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची कविता
अन्‌ जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके,
पावलांखाली धुके
सुख हे नवे,
सलगी करे,
का सांग ना ?
सारे जुने दुवे,
जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया
माझी ही आर्जवे
पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू
जरा हातात हात दे
पुसुया जुन्या पाऊलखुणा,
सोबत तुझी, साथ दे
वळणावरी तुझ्या
पाऊस मी उभा
ओंजळ तुझी
पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यांतल्या सरी
विसरून ये घरी
ओळख आता खरी
होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला
माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी
देईन साथ ही तुला
हे गाणं सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटातील आहे. अतुल कुलकर्णी आणि प्रथमच मराठी सिनेमात भूमिका करणारी सागरीका घाटगे या जोडीवर चित्रित झालेलं आहे. गीतकार अश्विनी शेंडे यांच्या या हळव्या शब्दांना अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीने उत्तम चालीने खुलवलं आहे. उत्कृष्ट गायक स्वप्निल बांदोडकर आणि गायिका बेला शेंडे यांनी गाण्यात स्वरमाधुर्य मिसळून गाण्याला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. सतत गुणगुणावसं वाटणारं हे गाणं शब्द, सूर आणि ताल यांचा उत्तम मेळ तर आहेच शिवाय प्रेमातली भावना हृदयापर्यंत पोहचवणारं गाणं देखील आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज