अ‍ॅपशहर

गाणं मनातलं

ठुमक चलत रामचंद्र हे प्रभू श्रीरामाचे अनन्यभक्त, ‘श्रीरामचरित मानस’ या महाकाव्याचे रचनाकार, ज्ञानी, पंडित, गोस्वामी, तुलसीदास यांचं सुंदर भजन आहे.

Maharashtra Times 31 Jan 2017, 5:00 am
ठुमक चलत रामचंद्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम song tulshidas bhajan thumak chalat ramchandra
गाणं मनातलं

गाणं मनातलं

गोविंद कोठावळे

प्रभू श्रीरामाचे अनन्यभक्त, ‘श्रीरामचरित मानस’ या महाकाव्याचे रचनाकार, ज्ञानी, पंडित, गोस्वामी, तुलसीदास यांच ‘ठुमक चलत रामचंद्र’ हे एक सुंदर भजन आहे. नाजूक पावलं टाकत चालायला शिकणाऱ्या बालक श्रीरामाचं, त्याच्या मातोश्री कोडकौतुक करीत आहेत. या कल्पनेचं सुरेख शब्दचित्रण त्यात करण्यात आलं आहे. प्रभू रामचंद्र ही देवता भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. या मर्यादा पुरुषोत्तमाच्या सद़्गुणालंकृत, आदर्श जीवन चरिताची महती आसेतुहिमाचल व्यापलेली आहे. भारतीयांचा पिंड त्यावर घडला आहे. तुलसीदासांची श्रद्धा व भावभक्ती यावर प्रसन्न झालेल्या श्रीरामांनी त्यांना यमुनाकाठीच्या चित्रकूट इथल्या घाटावर दर्शन देऊन त्यांच्या आणि स्वत:च्या भाळावर चंदनाचा टिळा लावून त्यांच्यावर अनुग्रह केला होता, अशी आख्यायिका आहे.
ठुमक चलत रामचंद्र
बाजत पैंजनिया
किलकी किलकी उठत धाय
गिरज भूमी लटपटाय
धाय मात गोद लेत,
दशरथकी रनिया
अंचल रज अंग झारी,
विविध भांती से दुलारी
तन मन धन वारी वारी
कहत मधुर वचनियां
अशा अगम्य, दैवी रूपाचं आकलन दुर्बोध असल्याची अनुभूती येतच असते. एका विचारवंतानं या विषयी मांडलेला ज्ञानेश्वर माऊलीचा सिद्धांत सांगतो, ‘आजी आनंदू आनंदू रे। जया श्रुती नेती म्हणती, तोची गोविंदू रे।’ ज्याचं वर्णन करता येत नाही म्हणून श्रुती थकून नेति नेत‌ि (हा नाही, हा नाहीच) म्हणतात, तो हाच गोविंद आहे. श्रीरामाच्या रूपाला उपमा देण्यास असमर्थ ठरलेले गोस्वामी तुलसीदासही अशाच अनुमानाप्रत आले आहेत. तेही म्हणतात, श्रीरामाच्या रूपाला उपमा नाही, म्हणूनच त्याचं रूप त्याच्यासारखंच आहे. सुंदर आशयाचं हे भक्तीकाव्य गायक अनुप जलोटा यांनी आपल्या सुरेल स्वरसाजानं रसिकांच्या हृदयात उतरवलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज