अ‍ॅपशहर

अचानक ठरलेली ट्रीप

माझे मित्र संजय ओरपे यांना सहली काढण्याचा छंद आहे. त्यांनी अशीच एक सहल महाबळेश्वरला काढली. अचानक ओरपेंचा मला फोन आला, माझ्यासोबत मदतनीस कुणी नाही. येता का? वीस वर्षानंतर पुन्हा महाबळेश्वर फिरायला मिळणार, त्यामुळे मी खुश झालो.

Maharashtra Times 19 Jul 2016, 5:23 am
संजय राजापकर, वसई रोड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sudden trip to mahabaleshwar
अचानक ठरलेली ट्रीप


माझे मित्र संजय ओरपे यांना सहली काढण्याचा छंद आहे. मुंबई महानरगपालिकेत नोकरी करता ते तो जोपासतात. या सहलीत अगदी माफक दरामध्ये प्रवास, नाश्ता आणि उत्तम जेवण मिळत असल्याने त्यांना २०-२५ मेंबर सहज मिळतात. त्यांनी अशीच एक सहल महाबळेश्वरला काढली. यावेळी पुजारी हे कर्मचारी आणि त्यांचे मित्र-मंडळी मिळून २०-२५ होते. अचानक ओरपेंचा मला फोन आला, माझ्यासोबत मदतनीस कुणी नाही. येता का? वीस वर्षानंतर पुन्हा महाबळेश्वर फिरायला मिळणार, त्यामुळे मी खुश झालो.
आम्ही दुस-या दिवशी सकाळी महाबळेश्वरला पोहोचलो. हॉटेलचं बुकिंग अगोदरच होतं. हॉटेलच्या व्यवस्थापकाने उत्तम सोय केली. चहापाननंतर आम्ही जवळची प्रेक्षणीय स्थळे पाहिली. मग पाचगणीला गेलो. तिथे घोडेस्वारीचा मोह आवरला नाही. एक पॉइंटवरून अख्खं पाचगणी दिसत होतं. तिथे एक झक्कास सेल्फी काढला. त्यानंतर पुन्हा हॉटेलवर गेलो. दुपारचं जेवण झालं. संध्याकाळी ४ वाजता इतर प्रेक्षणीय स्थळं पाहायला गेलो होतो. त्यात मंकी पॉइंट, सनसेट पॉइंट इत्यादी पॉइंट पाहिले. आम्हाला त्यादरम्यान गव्याचंही दर्शन झालं. पहिल्यांदाच इतक्या जवळून गवा पाहिला. यानंतर मस्त हुडहुडी भरवणाऱ्या थंडीतून आईस्क्रीम खाण्याची मजा अनुभवली. महाबळेश्वर शहरात खरेदी करून पुन्हा हॉटेलवर आलो. रात्री जेवल्यानंतर सगळ्यांनी संगीतावर ताल धरला. दुसऱ्या दिवशी प्रतापगड करून मुंबईला निघायचं म्हणून आम्ही सकाळी ९ वाजता हॉटेल सोडलं. पण सर्वांसाठी स्ट्रॉबेरी आणायला गेलेले ओरपे आणि एक ड्रायव्हर मात्र एक तास होऊनही परतले नाहीत. मी त्यांचा मदतनीस म्हणून पुजारी साहेबांनी चौकशी करायला सांगितली. पण ओरपे काही आणायला गेले तर लवकर परतणं मुश्कील आणि त्यात मोबाइल ते इथेच ठेऊन गेले होते. साडेअकरा वाजले तरी ओरपे न आल्याने पुजारी साहेबांच्या रागाचा पारा चढला. कारण हे सगळे पर्यटक पुजारींनीच आणलेले होते. ते सारेच पर्यटक त्यांच्याकडे विचारणा करत. ते माझ्याकडे विचारणा करत. मी मुंबईला संपर्क साधून ड्रायव्हरचा नंबर मिळवला आणि ओरपेंना संपर्क केला. पुढच्या दहा मिनीटांतच दोघं आले. त्यांना पाहून पुजारी साहेबांचा राग निवळला. मग आम्ही प्रतापगडला निघालो. दीड वाजता प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचलो. मग जेवण करून गड चढायला सुरूवात केली. गड पाहताना शिवाजी राजांचा जयजयकार चालू होता. त्यांचा अश्वारुढ पुतळा पाहून सगळ्यांनी त्यांना मानाचा मुजरा केला. संध्याकाळी ४ वाजता गडावरून उतरून परतीच्या प्रवासाला लागलो. मजल-दरमजल करत मुंबईत रात्री ११ला पोहोचलो. अशी ही अचानक ठरलेली सहल एकदम झक्कास झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज