अ‍ॅपशहर

श्रीशैलम, हैद्राबादची अनोखी सफर

मी, स्नेहल अडाणे, सुवर्णा जाधव आणि सुप्रिया चाचड अशा चार मैत्रिणी मिळून श्रीशैलम, हैद्राबाद ट्रीपला गेलो होतो. ही ट्रीप फार छान झाली. ही गोष्ट आहे १७ जुलै २०१६ची. आम्ही कर्जतहून दुपारच्या गाडीने हैदराबादसाठी निघालो.

Maharashtra Times 25 Oct 2016, 12:14 am
स्वाती मानेगावकर, रसायनी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swati manegaonkar sharing her trip memories
श्रीशैलम, हैद्राबादची अनोखी सफर

मी, स्नेहल अडाणे, सुवर्णा जाधव आणि सुप्रिया चाचड अशा चार मैत्रिणी मिळून श्रीशैलम, हैद्राबाद ट्रीपला गेलो होतो. ही ट्रीप फार छान झाली. ही गोष्ट आहे १७ जुलै २०१६ची. आम्ही कर्जतहून दुपारच्या गाडीने हैदराबादसाठी निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी हैदराबादहून श्रीशैलमला जाण्यासाठी बसचं बुकिंग अगोदरच केलं होतं. या सहा तासांच्या प्रवासातील नागमोडी वळणाच्या वाटा आणि इतर दृश्य फारच रमणीय होतं. साधारण ७० ते ७५ किलोमीटर प्रवासाची वाट जंगलातून आहे. आम्ही बसनी श्रीशैलमला पोहोचलो. त्यावेळेस गर्दी कमी असल्याने आम्हाला महादेवाचे दर्शन छान घेता आलं. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं हे श्रीशैलम फारच छान आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार झालो आणि ७.३०च्या बसने हैदराबादसाठी निघालो. परतीच्या प्रवासात आम्ही मोर आणि हरिण बघितलं. त्यादिवशी चारमिनार, हुसेनसागर, बिर्लामंदिर आणि सालरजंग म्युझियम पाहिलं. त्यानंतर रामोजी फिल्मसिटीला गेलो. अॅक्शन थिएटर, फिल्मी दुनिया, बर्ड पार्क, बटरफ्लाय गार्डन, लाईव्ह टीव्ही शो, मॅजिक शो, ज्यापनीज गार्डन बघितलं. आत फिरायला बस आणि सोबत गाइड असल्याने रामोजी फिल्मसिटी चांगल्याप्रकारे पाहू शकलो. अजून बरंच पाहण्यासारखं होतं. पण आमची हैद्राबादहून मुंबईला जाण्यासाठी रात्री ८.३०ची गाडी असल्याने तिथून लवकर निघालो. तिसऱ्या दिवशी गाडी खंडाळा घाटातून येताना तुफान पाऊस लागला. जागोजागी धबधबे दिसत होते. आसमंत ढगांनी व्यापला होता. त्यामुळे दरी दिसत नव्हती. भाषेची अडचण असूनही तेथील सगळ्यांच्या सहकार्याने, विशेषतः पोलिस, आमची श्रीशैलम ट्रीप छान झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज