अ‍ॅपशहर

ग्रँड कॅननची यादगार हवाई सफर

अमेरिकेच्या दौऱ्यात मानवनिर्मित आश्चर्य पहाण्यापेक्षा निसर्गनिर्मित आश्चर्य पहायला मिळावीत अशी माझी मनोमन इच्छा होती. माणसाने बांधलेले मोठमोठे वाडे, पूल, इमारती यापेक्षा निसर्गाने लाखो वर्षांच्या कलाकुसरीतून निर्मिलेले स्थळ नक्कीच प्रेक्षणीय असते, असा माझा अनुभव आहे.

Maharashtra Times 21 Nov 2016, 12:03 am
सुनील खानोलकर, वांद्रे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trip to grand cannyon
ग्रँड कॅननची यादगार हवाई सफर

अमेरिकेच्या दौऱ्यात मानवनिर्मित आश्चर्य पहाण्यापेक्षा निसर्गनिर्मित आश्चर्य पहायला मिळावीत अशी माझी मनोमन इच्छा होती. माणसाने बांधलेले मोठमोठे वाडे, पूल, इमारती यापेक्षा निसर्गाने लाखो वर्षांच्या कलाकुसरीतून निर्मिलेले स्थळ नक्कीच प्रेक्षणीय असते, असा माझा अनुभव आहे. त्यामुळेच नायगारा नंतर टप्प्या-टप्प्याने जेव्हा आम्ही लास वेगासला पोहोचलो. तेव्हा त्या लास वेगासच्या मोहनगरीपेक्षा मला अधिक मोह पडला होता तो ग्रँड कॅननचा.
ग्रँड कॅनन हा युनेस्कोने जाहीर केलेला एक जागतिक वारसा पहायचा एक मार्ग म्हणजे सुप्रसिद्ध लास वेगास या अमेरिकेतील नेवाडा प्रांतातील शहरात जावं लागतं. तेथून आम्ही एका चार्टर्ड, चिमुकल्या विमानाने ग्रँड कॅननच्या हवाई सफरीवर निघालो. हा गेल्या ४० कोटी वर्षां पूर्वीपासून कोलेरॅडो नदी खोऱ्यात ऊन, पाऊस, वादळ वाऱ्यामुळे आणि नदी प्रवाहामुळे डोंगराची झीज होऊन निर्माण झालेला चमत्कार आहे. हिरवळीचा मागमूस नाही. पण पर्वतांचे निर्माण झालेले विविध आकार अगदी स्तिमित करणारे आहेत. त्यातही त्या वैराण पर्वतांचे जे विविध रंगाविष्कार दिसतात ते फारच मनोहारी आहेत. त्यांच्या इतक्या वर्षांच्या झालेल्या झीजेमुळे माती, दगडांचे विलक्षण आकार तयार झालेत. त्या छोट्याशा विमानातून जणू एखाद्या पक्ष्याप्रमाणे आकाशातून विहरत ते आकार पहाणं हा एक लाईफ टाईम अनुभव होता.
ग्रँड कॅनन हे एक जागतिक नैसर्गिक ७ आश्चर्यांपैकी पहील्या स्थानावर असलेलं आश्चर्य आहे. अनेक वेडेपीर याच्या ओढीने येथे येतात. आपल्या आर्थिक आणि शारीरिक कुवतीनुसार याचा संचार करतात. कोणी या खोल खोल दरीतून पाठीवर सामान बांधून पायी हा प्रदेश तुडवतात. तर कोणी छोट्या नावेतून कोलोरॅडॉ नदीचा प्रवाह उलट्या दिशेने जाण्याच थरार अनुभवतात. एकंदर ४४६ किमी लांब, २९ किमी रुंद २ किमी खोल असा हा ग्रँड कॅनन अनेक 'डेअर डेव्हील्सना' गेली अनेक शतके आकर्षित करत आला आहे. काहींनी तर या थरारासाठी आपले जीवही गमावलेत. आम्ही एक तासभर त्या लहानशा विमानातून संचार करत, डोळे भरुन तो नजारा पहात होतो. आयुष्याभर लक्षात रहाणारा असा अनुभव होता तो. शक्य असेल तर प्रत्येकाने तो अनुभव जरुर घ्यावा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज