अ‍ॅपशहर

नशीब म्हणून बचावलो!

मी, माझे यजमान आणि आमची दोन लहान मुलं, दोन वर्षाचा विजय आणि पाच वर्षाचा शरद, यांना घेऊन १९७० साली आम्ही महाराष्ट्र दर्शनाला निघालो होतो. आमच्यासोबत गावातील दोन मित्रपरिवारातील कुटुंबंसुद्धा होती. आम्ही आधी वेरुळच्या लेण्या, दौलताबाद किल्ला आणि अजिंठा लेण्या बघितल्या.

Maharashtra Times 21 Oct 2016, 12:28 am
कमल काळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kamal kale sharing her experince
नशीब म्हणून बचावलो!

मी, माझे यजमान आणि आमची दोन लहान मुलं, दोन वर्षाचा विजय आणि पाच वर्षाचा शरद, यांना घेऊन १९७० साली आम्ही महाराष्ट्र दर्शनाला निघालो होतो. आमच्यासोबत गावातील दोन मित्रपरिवारातील कुटुंबंसुद्धा होती. आम्ही आधी वेरुळच्या लेण्या, दौलताबाद किल्ला आणि अजिंठा लेण्या बघितल्या. त्यानंतर शिर्डी येथे जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. तिथं एक दिवस मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी आम्ही परतीची बस पकडली. आम्ही निघालो तेव्हा पाऊस सुरु झाला होता. काही अंतर गेल्यावर एका दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीमुळे आमची बस एका गावात थांबली. पूर कमी होण्याची वाट पाहत आम्ही दोन तास त्या गावात थांबलो. काही वेळाने एका बैलगाडीवाल्याने आम्हाला पलीकडच्या गावात सोडण्याची तयारी दाखवली. आम्ही बायका बैलगाडीत बसलो आणि पुरुष मंडळीनी लहान मुलांना खांद्यावर घेऊन नदी ओलांडली. कंबरभर पाणी वाहत होतं. नदी पार केल्यावर आम्ही शेगावला जाणारी दुसरी बस पकडली. पुढे पाच किमी अंतर पार केल्यावर गोदावरी नदी आली. तिला मोठा पूर आलेला होता आणि पुलावरून पूराचे पाणी वाहत होते. पलीकडच्या तीरावरील लोक सांगत होते की गाडी निघेल, म्हणून बस चालकाने भीत-भीत बस न दिसणाऱ्या पुलावरून चालवायला सुरुवात केली. गोदावरी नदीचं रौद्र रुप पाहता-पाहता अचानक एक जोराचा धक्का बसून बस थांबली. बसमधील सहप्रवाशी आरडाओरडा करायला लागले. नंतर समजलं की, बसचे पुढचं चाक पुलावरुन खाली उतरलं असून मागचं चाक पुलाच्याकडेला असलेल्या दगडामुळे अडकलं आहे. आमच्यासहीत सगळे सहप्रवाशी एकदम घाबरले होते. काय करावं काही सुचेना. शेवटी एकमेकांचे हात धररन, पुलावर कमरेएवढे पाणी असताना, कसेबसे आम्ही एकदाचे नदीच्या बाहेर आलो. गजानन महाराजाची कृपा म्हणून आमचे प्राण वाचले. नाहीतर पूर्ण गाडी २५ प्रवाश्यांसह नदीत पडून वाहून गेली असती. नशीब बलवत्तर म्हणून सगळे लोक बचावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज