अ‍ॅपशहर

मानसिक धक्क्यातून सावरलं

आम्ही त्यावेळेस अहमदनगर येथे राहत होतो. आमच्या अपार्टमेंटमध्ये शेरीकर दाम्पत्यही राहत होतं. शेरीकर काका सेंट्रल बँकेमधून शाखाधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यावेळी काका ६७ वर्षांचे व काकू ६३ वर्षांच्या होत्या. त्यांना एकच मुलगा होता. मुलगा हुशार व लोकप्रिय होता. मुंबईला शिकत होता. लग्न झाल्यानंतर अठरा वर्षांनी खूप प्रयत्न व उपाय करून मुलगा झाल्याने तो सर्वांचा लाडका होता.

Maharashtra Times 17 Oct 2017, 12:44 am
विठ्ठल मसलेकर, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my pillars of happiness
मानसिक धक्क्यातून सावरलं


आम्ही त्यावेळेस अहमदनगर येथे राहत होतो. आमच्या अपार्टमेंटमध्ये शेरीकर दाम्पत्यही राहत होतं. शेरीकर काका सेंट्रल बँकेमधून शाखाधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यावेळी काका ६७ वर्षांचे व काकू ६३ वर्षांच्या होत्या. त्यांना एकच मुलगा होता. मुलगा हुशार व लोकप्रिय होता. मुंबईला शिकत होता. लग्न झाल्यानंतर अठरा वर्षांनी खूप प्रयत्न व उपाय करून मुलगा झाल्याने तो सर्वांचा लाडका होता.
आम्ही त्यावेळी तिथं नुकतंच रहावयास गेलो होतो. काका व काकूंना मधुमेह, रक्तदाब व त्यांची बायपास सर्जरीही झालेली होती. दोघं स्वत:च्या फ्लॅटमध्ये निवृत्तीनंतरचं आयुष्य औषध, गोळ्या व हाताशी आलेल्या एकुलत्या एक मुलाच्या भविष्यातील विचारात घालवत होते. पैशाची काळजी नव्हती, येणारी सून समाधानी मिळो ही आशा त्यांच्या जगण्याचं साधन बनलं होतं. माझ्या पत्नी व मुलांचं त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं.
देवाच्या मनात मात्र वेगळंच होतं. काका व काकूंचा तो मुलगा अवघ्या २२व्या वर्षी ग्राऊंडवर खेळताना पडला व त्याचा अचानक मूत्यू झाला. क्षणार्धात हे घडलं ती म्हणजे ७ मार्च. या दिवशी माझ्या घरी, माझ्या ६१व्या वाढदिवसाची तयारी चालू होती. मुंबईहून अचानक ही वार्ता आली आणि वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला. त्या मुलावर अंत्यसंस्कार झाले. नातेवाईक कालांतराने निघून गेले व काका, काकूंना एकटेपण जाणवू लागला. हाताशी आलेला मुलगा काळाने हिरावून नेला ही घटना त्यांना सहन होईना.
दोघांमध्ये अमूलाग्र बदल झाला होता. त्या दोघांनाही मानसिक धक्का बसल्याने त्याचा शरीरावरही परिणाम झाला. त्यांचं बोलणं बंद झालं. त्या दोघांनाही जीवनात काही रसच उरला नाही. त्यामुळे साखर पातळी व रक्तदाब वाढला. मानसिक धक्यातून त्यांना कसं बाहेर काढायचं हा प्रश्न पडला. त्यांची ती अवस्था बघवेना, प्रसंग तसा कसोटीचा होता. आम्ही त्यांना नगरच्या सेराजेम संस्थेत आणलं. तिथं सर्व वयाचं लोक थेरपी घेतात. आपली सर्व सुख-दु:ख सांगतात. तिथं गेल्यावर त्यांना कळलं की, आपल्यापेक्षा किती दु:खी लोक आहेत. जीवन जगावंच लागतं, हे त्यांना पटलं. हळूहळू त्यांच्यात मानसिक उभारी आली. आता ते ठीक आहेत. त्याबद्दल सर्वांनी माझं कौतुक केलं. कौतुकापेक्षा त्यांच्या कसोटीच्या क्षणी सावरणं ही खरी कसोटी होती. त्यात आालेल्या यशाचं समाधान अमोल व आनंददायी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज