अ‍ॅपशहर

आम्ही परत माणसात आलो

मी २०१६ मध्ये आम्ही दोघं युरोप सहलीसाठी रवाना झालो. पहिल्या दिवशी लंडन शहर पाहून बेल्जीयम मध्ये प्रवेश केला. मिनी युरोप पाहत असताना बोलण्याच्या नादात आम्ही बरेच पुढे गेलो. थोड्याच वेळात आम्ही चुकलो असल्याचं लक्षात आलं.

Maharashtra Times 4 Nov 2017, 12:10 am
व्ही. सी. महाजन, कर्वेनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम test time
आम्ही परत माणसात आलो


मी २०१६ मध्ये आम्ही दोघं युरोप सहलीसाठी रवाना झालो. पहिल्या दिवशी लंडन शहर पाहून बेल्जीयम मध्ये प्रवेश केला. मिनी युरोप पाहत असताना बोलण्याच्या नादात आम्ही बरेच पुढे गेलो. थोड्याच वेळात आम्ही चुकलो असल्याचं लक्षात आलं. अनेकांना मदतीची विनंती केली. आमच्या विनंतीची कुणीही दखल घेतली नाही. माझ्या बायकोचा चाणाक्षपणा आणि लंडनमध्ये स्थायिक झालेला भारतीय विवाहित मुलगा हे कामास आले. त्या मुलानं आणि त्याच्या बायकोनं आम्हाला खूप मोठा धीर दिला. तिथंच असलेल्या स्थानिक व्यक्तीकडून त्यानं त्याचा मोबाइल मागून घेतला आणि आमच्या टूर लीडरबरोबर संपर्क प्रस्थापित केला. त्यामुळे पाच मिनिटांत बस आमच्यापाशी आली आणि आम्ही परत माणसात आलो. तो मुलगा आम्हास भेटला नसता, तर परदेशात आमचं काय झालं असतं याची कल्पनाही करू शकत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज