अ‍ॅपशहर

दत्ताचे आभार

एखाद्याच्या आयुष्यात एखादं वळण इतकं भयंकर येतं की, त्यातून ती व्यक्ती सावरेल की संपेल याची खात्रीच नसते. माझ्याही जीवनात २००४ साली असंच एक भयंकर वळण आलं होतं.

Maharashtra Times 28 Jul 2016, 4:04 am
वैशाली आहेर, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम brother helped sister in her tough time
दत्ताचे आभार


प्रत्येकाचं आयुष्य हे वळणदार घाटातल्या वाटेप्रमाणे असतं. जीवनातले चढ उतार, सुख दु:ख, राग, मान-अपमान अशा वेगवेगळ्या वळणावरुन प्रत्येकजण प्रवास करत असतो. पण एखाद्याच्या आयुष्यात एखादं वळण इतकं भयंकर येतं की, त्यातून ती व्यक्ती सावरेल की संपेल याची खात्रीच नसते. माझ्याही जीवनात २००४ साली असंच एक भयंकर वळण आलं होतं. सगळं होत्याचं नव्हतं झालं. त्या काळात खरोखरच आपले कोण आणि परके कोण? हे समजलं. माणसं अगदी जवळून वाचता आली. खरं खोटं सगळं स्पष्ट झालं. 'असतील शीतं तर जमतील भूतं' या म्हणीचा प्रत्यय आला. पण अशा वळणावरही मला मुलांसाठी जगायचं होतं. माझं छोटं विश्व मला शून्यातून निर्माण करायचं होतं. शारीरिक शक्ती संपली होती पण आत्मविश्वास थोडाफार शिल्लक होता. त्याचवेळी मला आधार दिला माझ्या धाकट्या भावाने दत्ताने. जन्मदाते तर आपलेच असतात पण भावानेही मला खूप सहकार्य केलं. त्याच्या पाठिंब्यामुळेच मी स्वतःला सावरू शकते. त्याने मला आर्थिक मदत केली. माझ्याशी बोलून मानसिक आधारही दिला. लहानपणी ज्या भावाशी मी भरपूर भांडले होते. तोच भाऊ आता माझा आधारस्तंभ झाला होता. माझ्या जगण्याची उमेद बनला होता. मनापासून त्याचं कौतुक आणि खूप खूप आभार. त्याच्यासाठी मी एवढचं म्हणेन की,

दु:ख तुझे सारे मजपाशी येवो, सुखाने आनंदाने तुझे जीवन सरो

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज