अ‍ॅपशहर

तापातून बचावलो

तो १९७०चा मार्च महिना होता. मी एका कंपनीत लागून जेमतेम दीड वर्ष झालं होतं. मला एके दिवशी कंपनीत अचानक ताप भरला. मी एकटा होतो. माझा भाचा विश्वास घाटे मला त्या वेळेला नेमका भेटायला आला होता. त्यानं एकंदर पाहिल्यावर मला घरी बहिणीकडे हलवलं. डॉक्टरला बोलावल्यावर त्यांनी मला पोट साफ होण्याचं औषध दिलं आणि तिथंच सगळा घात झाला.

Maharashtra Times 23 Mar 2017, 9:02 am
दिलीप केळकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम escaped from fever
तापातून बचावलो


तो १९७० चा मार्च महिना होता. मी एका कंपनीत लागून जेमतेम दीड वर्ष झालं होतं. मला एके दिवशी कंपनीत अचानक ताप भरला. मी एकटा होतो. माझा भाचा विश्वास घाटे मला त्या वेळेला नेमका भेटायला आला होता. त्यानं एकंदर पाहिल्यावर मला घरी बहिणीकडे हलवलं. डॉक्टरला बोलावल्यावर त्यांनी मला पोट साफ होण्याचं औषध दिलं आणि तिथंच सगळा घात झाला. जुलाब सुरू होऊन माझी तब्येत खूपच ढासळली. त्यावेळी डॉ. देशपांडे आमच्या कुटुंबाच्या परिचयाचे असल्यानं त्यांना बोलावलं. रात्री दहा वाजता ते आल्यावर त्यांनी मला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा आदेशच दिला.

रात्री ११ वाजता मला डॉ. पाबळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉ. शाल‌निी पाबळकर यांनी प्रयत्न करून ताप आटोक्यात आणला. डॉ. देशपांडे यांनी निदान केल्याप्रमाणे तो टायफॉइड होता. वडील जपाची माळ घेऊन माझ्या उशाशी बसून असायचे. आठ दिवसांनंतर मला घरी सोडण्यात आलं. मी पूर्णपणे बरा नव्हतो. कारण ताप डोक्यात गेल्यानं मानसिक आरोग्य ढासाळलं होतं. कॉटवर झोपलो, तर छताला चिकटल्याचा भास व्हायचा.

मग माझे भाऊ सिद्धराज केळकर यांच्या घरी मला हलवलं. ताप दोन वेळा उलटला. साधारण दहा दिवस मी बिछान्याला खिळून होतो. धड बोलताही येत नव्हतं. वडिलांच्या परिचयाचे डॉ. सोमण यांनी उपचार करून मला बोलतं केलं. गोळ्या आणि महिनाभर दररोज इंजेक्शन घेऊन मी पूर्ण बरा झालो. त्यावेळी माझे बंधू सिद्धराज आणि शरयू वहिनी यांनी माझी खूपच काळजी घेतली. आहार आणि औषध त्यांनी उत्तम सांभाळलं.

आज ४५ वर्षांपूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात खूपच फरक जाणवतो. अचूक निदान हा तर डॉक्टरांचा खरा कस असतो. तो माझ्या बाबतीत कमी पडला असावा म्हणून मला अशा भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागलं. मला बरं करणाऱ्या वरील सर्व मंडळींचे आभार शब्दांत व्यक्त करणं केवळ अशक्य आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज