अ‍ॅपशहर

साधेपणाला सलाम

व्यायाम, योग, प्राणायाम, हास्य प्रकार करतो. एकत्र कुटुंब असल्यासारखे आमचे संबंध आहेत.

Maharashtra Times 13 Jun 2017, 3:00 am
माझं वय सध्या ८५च्या घरात आहे. मी गेले १६-१७ वर्षं ‘चैतन्य हास्य योग मंडळा’त जाते. आमची शाखा दीपा लागूंनी नवसह्याद्री सोसायटीत सुरू केली आहे. गेली १० वर्षं आम्ही भरतकुंज संकुल इथं संध्याकाळी एक तास जमतो. ३५-४० सभासद आमच्या शाखेत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम laughter club deepa lagoo
साधेपणाला सलाम

व्यायाम, योग, प्राणायाम, हास्य प्रकार करतो. एकत्र कुटुंब असल्यासारखे आमचे संबंध आहेत. सर्वजण एकमेकांची खूप काळजी घेतात. इथं येऊन सर्वांना खूप उत्साह आणि ऊर्जा मिळते. दिवस छान जातो. मध्यंतरी मी चिकनगुनियानं बेजार होते. ४-५ महिने त्रास झाला. आमचे सर्व सभासद भेटून गेले.
थोडं चालायला यायला लागल्यावर दीपाताई मला धरून गाडीतून घेऊन जाऊ लागल्या. ‘इथं आल्यावर वातावरणानं तुम्हाला लवकर बरं वाटेल,’ असं म्हणून मला घेऊन जात आणि आणून सोडत. मला खूप संकोच वाटे; पण तब्बेत सुधारू लागली. चालण्यातही प्रगती झाली.
आता मी बऱ्यापैकी चालते. तरीही आग्रह करून दीपाताई सोडायला येतातच. दीपाताईंच्या या साधेपणाला, प्रेमळ स्वभावाला माझा सलाम.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज