अ‍ॅपशहर

सुखी आयुष्यासाठी बाप्पाचे आभार

लोकहो आपणास आश्चर्य वाटेल की, आज कित्येक वर्षं झाली, अनेक मंगळवारी तसंच बहुतेक चतुर्थीला मला एकतरी जास्वदींचं फुल झाडावर मिळतंच. काही वर्षं मी लावलेलं जास्वदीचं झाड जगत नव्हतं, काही वर्षांनी ते जगलं तेव्हा मला आनंद झाला. काही लोक झाडावरच्या कळ्या आदल्या दिवशी काढतात. तरीही बाप्पा माझ्यासाठी एकतरी फुल ठेवतातच. म्हणून मला गणपती बाप्पाला थँक यू म्हणावंसं वाटतंय.

Maharashtra Times 25 Aug 2017, 12:58 am
अपर्णा पोतदार, नालासोपारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम many many thanks to bappa
सुखी आयुष्यासाठी बाप्पाचे आभार


लोकहो आपणास आश्चर्य वाटेल की, आज कित्येक वर्षं झाली, अनेक मंगळवारी तसंच बहुतेक चतुर्थीला मला एकतरी जास्वदींचं फुल झाडावर मिळतंच. काही वर्षं मी लावलेलं जास्वदीचं झाड जगत नव्हतं, काही वर्षांनी ते जगलं तेव्हा मला आनंद झाला. काही लोक झाडावरच्या कळ्या आदल्या दिवशी काढतात. तरीही बाप्पा माझ्यासाठी एकतरी फुल ठेवतातच. म्हणून मला गणपती बाप्पाला थँक यू म्हणावंसं वाटतंय. मला कंठी करण्याचा छंद आहे. पूर्वी दुर्वांचा हार करत होती, नंतर कंठी करू लागली. हल्ली मला जमत नाही, कारण दुर्वा निवडणं, त्यांची जुडी करणं इत्यादी आता जमत नाही. काही लोकं मला एक जास्वदींचं फुल आणून देतात. ही सर्व बाप्पांची योजना आहे. आमच्या कॉलनीत पवार ताई (लक्ष्मी पवार) राहतात. त्यांना माझं खूप कौतुक आहे, त्यांच्या घरातील गणपतीचं विसर्जन असतं त्यादिवशी मी त्यांच्या बाप्पाला 'कंठी' करून देत असे. पण इतकी वर्षं माझ्या लाडक्या गणरायाने मला सुखी आयुष्य दिलं त्याबद्दल त्याचे अनंत उपकार आहेत.
बालकापरी जवळी घे मज,
ईश जगाचा तू, मी तव पदरज,
मनोहर तुझी मूर्ती पहावया
लागे दिव्य दृष्टी देई मोरया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज