अ‍ॅपशहर

१० जानेवारी १९६७

Maharashtra Times 10 Jan 2017, 5:00 am
दीव-दमणचे स्वागत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 january 1967
१० जानेवारी १९६७

मुंबई - दीव व दमणमधील जनतेने गुजरातमध्ये विलीन व्हावयाचे ठरविल्यास गुजरात त्यांचे अतिशय आनंदाने स्वागत करील, असे गुजरातचे मुख्यंत्री हितेंद्र देसाई यांनी जनमत कौलानिमित्त तेथील जनतेला दिलेल्या संदेशात म्हटले आहे. गुजरात सरकारच्या नोकरांना मिळणाऱ्या सर्व सवलती तेथील नोकरांनाही मिळतील, असे सांगून ते म्हणाले की अधिक सवलती मिळत असतील तर त्या चालू ठेवण्यात येईल.

'गाढवाला…' प्रयोग बंद
नागपूर – ‘गाढवाला भेटला गुरू’ या मुंबईच्या जाणकार संस्थेमार्फत धनवटे रंगमंदिरात शनिवारी रात्री चालू असलेला नाट्यप्रयोग निराश झालेल्या प्रेक्षकांनी गोंधळ माजवून बंद पाडला. काही प्रेक्षकांनी रंगभूमीवर जाऊन गोंधळ केला. काही प्रेक्षक मेकअपच्या खोलीत शिरले व त्यांनी सामानाची नासधूस केली. गाढवाला भेटला गुरू या ग. दि. माडगूळकर लिखित आणि राजा परांजपे दिग्दर्शित लोकनाट्याची नृत्यप्रधान, संगीतप्रधान, विनोदी, बेफाम नाट्यप्रयोग अशी जाहिरात करण्यात आली होती. पण लोकांना प्रत्यक्षात सेटिंग व नेपथ्य काहीच दिसले नाही व हा नाट्यप्रयोग नसून तमाशा असल्याचे व दिशाभूल झाल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले. ते सहन न होऊन दोन तासानंतर काही प्रेक्षकांनी प्रकरण हातघाईवर आणले व प्रयोग बंद पाडला.

चीनमध्ये यादवी
पेकिंग - लाल रक्षकांनी सरकारी कचेऱ्यांचा ताबा घेण्यास सुरवात केली असून ऑगस्ट-सप्टेंबरनंतर पेकिंगच्या रस्त्यांवर सार्वजनिक आत्मनिंदा करून घेणारे अनेक अधिकारी आढळले. टोकियो व हाँगकाँग येथून आलेल्या वार्तेप्रमाणे तर चीन यादवीच्या उंबरठ्यावर असून अनेक ठिकाणी रक्तपात झाल्याचे वृत्त आहे.

केंद्र असमर्थ
नवी दिल्ली - घटनेत उल्लेख केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गोसंरक्षण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असला तरी राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या या विषयावर सरकार त्यांना आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहखात्याच्या एका प्रवक्त्याने केले. केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशात यापूर्वीच गोहत्येवर बंदी घातली आहे. दिल्ली, दादरा व नगरहवेली या प्रदेशात गोहत्येवर पूर्णपणे बंदी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज