अ‍ॅपशहर

१४ डिसेंबर १९६७

Maharashtra Times 14 Dec 2017, 4:00 am
ग्रीसमध्ये प्रतिक्रांती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 december 1967
१४ डिसेंबर १९६७

अथेन्स – ग्रीसमध्ये लष्कराच्या काही तुकड्यांनी बंड केल्याच्या बातम्या आहेत. आज बरेच रणगाडे आणि चिलखती गाड्या अथेन्स शहरात घुसल्या. पंतप्रधान कोलायस तसेच अथेन्स रेडिओ स्टेशनला त्यांनी वेढा घातला. राजधानीचे इतर प्रांतांशी असणारे दळणवळण तोडून टाकण्यात आले. लोकशाही रक्षणासाठी आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन राजे कॉन्स्टन्टाईन यांनी मध्य ग्रीसमधील लारिसा येथील आकाशवाणी केंद्रावरून केले आहे.
कोयना धरण भक्कम होणार
नवी दिल्ली – कोयना धरण परिसरात पुन्हा धरणीकंप होण्याची शक्यता आहे काय आणि असल्यास संरक्षणात्मक उपाययोजना काय करता येईल, याबद्दल सरकारला सल्ला देण्यासाठी नामवंत तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात येत आहे. केंद्रीय पाटबंधारे मंत्री डॉ. के. एल. राव यांनी ही घोषणा आज संसदेत केली. धरणामुळे भूकंप झालेला नाही, असे स्पष्ट करून डॉ. राव म्हणाले की, धरणाच्या भिंतीला काही तडे गेले आहेत. पण आता धरण आणखी भक्कम करण्यात येईल.
रुपया स्थिर राहणार
नवी दिल्ली – पौंडाचे अवमूल्यन झाले असले तरी भारतीय चलनाचे आणखी अवमूल्यन करण्याचा प्रश्नच नाही. ते करावयाचे असते तर ताबडतोबच केले असते, असे उपपंतप्रधान मोराराजी देसाई यांनी आज राज्यसभेत सांगितले. ब्रिटनमधून येणारा माल आता स्वस्त होईल तसेच ब्रिटनने दिलेल्या कर्जाचा बोजाही या अवमूल्यनामुळे हलका होईल, असेही अर्थखाते सांभाळणारे मोरारजी देसाई म्हणाले.
ज्योत्स्ना भोळे यांची मैफल
मुंबई – दादर येथील काही संगीतकार व संगीतप्रेमी तरुणांनी ‘स्वरवर्षा’ ही संस्था स्थापन झाली आहे. तिचे उद्घाटन श्रीमती ज्योत्स्ना भोळे यांच्या मधुर मैफलीने झाले. ज्योत्स्नाबाईंनी राग ‘गोरख कल्याण’, राग ‘जलधर केदार’, ठुमरी, भजन, मराठी पदे आदी विविध संगीत प्रकार ऐकवले.
जामीन तोडून फरारी
मुंबई – चोरट्या घड्याळांची आयात केल्याबद्दल अटक झालेला यांत्रिक गलबताचा कप्तान व इतर नऊ आरोपी जामिनावर सुटल्यावर त्याच गलबतातून दुबईला पळून गेले आहेत. एक्साईज अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक केल्यावर हे गलबत सोडून दिले होते. कप्तान अरबी, एक आरोपी केरळी तर दुसरा एक पाकिस्तानी होता.
(१४ डिसेंबर, १९६७ च्या अंकातून)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज