अ‍ॅपशहर

२२ नोव्हेंबर १९६८

संगीत नाटक अकादमीच्या पारितोषिकांसाठी निवड झालेल्या बारा कलावंतांमध्ये गानतपस्विनी श्रीमती मोघूबाई कुर्डीकर यांचा समावेश आहे. 'जत्रा' या बंगालमधील पारंपरिक नाट्यप्रकारास यंदा प्रथमच अकादमी अॅवॉर्ड मिळाले. नाट्यक्षेत्रात मोहन राकेश, बादल सरकार यांना पारितोषिके मिळाली.

Maharashtra Times 22 Nov 2018, 10:47 am
२२ नोव्हेंबर १९६८
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mogubai-kurdikar



मोघूबाईंना अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली - संगीत नाटक अकादमीच्या पारितोषिकांसाठी निवड झालेल्या बारा कलावंतांमध्ये गानतपस्विनी श्रीमती मोघूबाई कुर्डीकर यांचा समावेश आहे. 'जत्रा' या बंगालमधील पारंपरिक नाट्यप्रकारास यंदा प्रथमच अकादमी अॅवॉर्ड मिळाले. नाट्यक्षेत्रात मोहन राकेश, बादल सरकार यांना पारितोषिके मिळाली.

भूदान स्वप्नाळू नाही

मुंबई - भूदान किंवा ग्रामदान या केवळ स्वप्नाळू कल्पना नाहीत, तर ती समाजाला आर्थिक, सामाजिक व नैतिक स्वातंत्र्य प्राप्त करून देणारी आंदोलने आहेत, असे उद्गार सर्वोदयी विचारवंत जयप्रकाश नारायण यांनी आज येथील टाटा प्रेक्षागारात 'आजची परिस्थिती व ग्रामदान' या विषयावर बोलताना काढले. भूदान चळवळीवर होणारी टीका अज्ञानातून होते, असे सांगून त्यांनी गांधीजींची सामाजिक परिवर्तनाची कल्पना व त्यावर आधारित ग्रामदान यांचा अन्योन्य संबंध समजावून सांगितला.

न्यायाधीशास दंड

औरंगाबाद - बेदरकार मोटार चालवून एका इसमाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या आरोपावरून सध्या भंडारा येथे सेशन्स जज्ज असलेले वा. भि. जोशी यांना कन्नड येथील पहिला वर्ग न्यायाधीश लोणकर यांनी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पुस्तकावर बंदी नाही

नागपूर - मुंबईमधील कॉन्व्हेंट शाळांमधून शिकविण्यात येणाऱ्या 'अ कन्साइज हिस्टरी ऑफ इंडिया' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुदार उद्गार असले तरी त्यावर उपाय योजता येत नाहीत, कारण क्रमिक पुस्तक म्हणून ते माध्यमिक शिक्षण मंडळाने मंजूर केलेले नाही, असे विधानसभेत आज शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी सांगितले. आपल्या देशात लेखनस्वातंत्र्य असल्याने या पुस्तकाच्या निर्मितीवर बंधन घालता येत नाही, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज