अ‍ॅपशहर

मटा ५० वर्षांपूर्वी-निजलिंगप्पा-इंदिरा भेट

मुंबई - काँग्रेस संघटनेत ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा नव्या दमाने प्रयत्न चालू झाले असून एक-दोन दिवसात त्यांना यश येण्याची आशा आहे. काँग्रेस संघटना कोणत्याही परिस्थितीत फुटू नये

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2019, 8:35 am
ऐक्याचे प्रयत्न चालू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 50 years ago
मटा ५० वर्षांपूर्वी-निजलिंगप्पा-इंदिरा भेट


मुंबई - काँग्रेस संघटनेत ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा नव्या दमाने प्रयत्न चालू झाले असून एक-दोन दिवसात त्यांना यश येण्याची आशा आहे. काँग्रेस संघटना कोणत्याही परिस्थितीत फुटू नये, असे प्रामाणिकपणे वाटणारे अनेक काँग्रेस कार्यकर्ते असून त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आहेत. सध्या यादृष्टीने दिल्लीत बऱ्याच वाटाघाटी चालू आहेत, असे आज दिल्लीहून परतलेल्या काँग्रेस नेत्यांकडून समजते.

निजलिंगप्पा-इंदिरा भेट

नवी दिल्ली - निजलिंगप्पा आणि इंदिरा गांधी गटात समेट होऊन काँग्रेस पक्षात पुन्हा एकोपा नांदावा म्हणून चाललेल्या प्रयत्नांना आज म्हैसूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांच्या भेटीगाठीमुळे अधिकच गती मिळाली आहे.

बुंदीवर बंदी

वसई - पानवेलीच्या मंडपासाठी लागणाऱ्या बुंदी तोडण्याची परवानगी देण्याचे जंगल खात्याने नाकारल्याने वसई तालुक्यातील पानमळेवाल्यांपुढे मोठीच अडचण निर्माण झाली आहे. वसई तालुक्यात उत्तम प्रतीच्या भाताचे पीक, दर्जेदार केळ्यांचे व सकस भाजीपाल्याचे उत्पन्न जसे भरघोस मिळते, तसे या तालुक्यात नागवेल म्हणजे विड्याच्या पानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून या पानांची विक्री सौराष्ट्र, पंजाब, दिल्ली, आग्रा या प्रांतात होते.

नवे गणित

पुणे - शालान्त परीक्षा मंडळातर्फे येत्या एक-दोन वर्षात माध्यमिक शाळांतून ऐच्छिक विषय म्हणून 'नवे गणित' हा विषय सुरू करण्यात येणार आहे. काही शाळांमधून हा विषय सुरूही करण्यात आला आहे. नव्या दृष्टिकोनातून गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग दिले जात आहे. यासंबंधीचा अभ्यासक्रम सर्व शाळांना देण्यात आला आहे. या विषयाचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्याचा समारंभ नुकताच शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झाला.

(६ नोव्हेंबर, १९६९च्या अंकातून)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज