अ‍ॅपशहर

बुधवार ८ फेब्रुवारी १९६७

Maharashtra Times 8 Feb 2017, 4:00 am
मंगळवारीही अंधार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8th february 1967
बुधवार ८ फेब्रुवारी १९६७


मुंबईः कऱ्हाड सोलापूर वीज मार्गावर आज संध्याकाळी घातपाताचा पुनः एक प्रकार झाल्यामुळे सबंध सोलापूर जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही अंधारच होता, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष जी. एन. पंडित यांनी मध्यरात्री महाराष्ट्र टाइम्सला दिली. सोमवारी संपाच्या पहिल्या दिवशी कोयनेच्या मुख्य वीज प्रवाहावर घातपाती प्रकार संध्याकाळी ५ वाजता झाला. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र व कोकण व मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना काल प्रकाश मिळाला नाही. परंतु वीज मंडळाच्या इंजिनियरांनी आज सकाळी १० वाजून ४६ मिनिटांनी दुरुस्ती केल्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला.

प्रश्नपत्रिका मराठीत

जबलपूरः येथील महाराष्ट्र हायर सेकंडरी स्कूलमधील एक विद्यार्थिनी मीना चितळे हिने मध्य प्रदेश माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाचा शालान्त परीक्षांच्या प्रश्नपत्रिका केवळ इंग्रजी व हिंदी या भाषातूनच काढाव्यात हा हुकूम रद्द करावा व या प्रश्नपत्रिका मराठीतूनही मिळाव्यात, अशी मागणी करणारा अर्ज मध्यप्रदेशच्या वरिष्ठ न्यायालयात गुदरला होता. या अर्जाचा निकाल न्यायमूर्ती मंडळाने घटनेच्या २६६ कलमान्वये मीना चितळे यांच्या बाजूने देऊन शालान्त मंडळाला इंग्रजी हिंदीप्रमाणे मराठी व ऊर्दूतूनही काढण्याचा आदेश दिला.

सहकुटुंब निवडणुकीत

पाटणाः रामगडचे राजा बहादूर कामाक्ष नरेनसिंग यांचे सर्वच्या सर्व कुटुंब यंदा निवडणुकीत उतरले आहे. स्वतः नरेनसिंग हे दोन मतदार संघातून उभे आहेत. त्यांची पत्नी ललिता व आई मंजरी देवी या दोघीही लोकसभा व विधानसभा या दोन्हीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणुका लढवीत आहेत. मुलगा इंद्र जितेंद्र हा बिहार विधानसभेसाठ दोन मतदार संघातून उभा आहे. धाकटा भाऊ वसंत व त्याची पत्नी विजयाराजे ही सुद्धा लोकसभेसाठी निवडणूक लढवीत आहे.

कॅशियस क्ले अजिंक्य

हौस्टन, टेक्सासः एर्मी टेरे टेरेलचा गुणावर पराभव करून कॅशियस क्लेने जागतिक मुष्ठियुद्धातील हेवी वेट गटाचे अजिंक्यपद आपल्याकडे राखले. हा त्याचा २८ वा विजय आहे. या दोन बलदंड शरीराच्या मुष्ठियोध्यांची झुंज पाहण्यासाठी ३७ हजारांवर प्रेक्षक उपस्थित राहिले होते. कारण क्ले यावेळी लढणार होता तो जागतिक मुष्ठियुद्ध असोसिएशनच्या अजिंक्यवीर टेरेल याच्याशी. त्यामुळे ही लढत चुरशीची ठरणार अशीच अपेक्षा होती आणि तशी ती रंगली देखील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज