अ‍ॅपशहर

50 YEARS AGO

पन्नास वर्षांपूर्वी

Maharashtra Times 9 Oct 2017, 4:00 am
९ ऑक्टोबर १९६७
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 october 1967
50 YEARS AGO

अॅटली यांचे देहावसान
लंडन - इंग्लंडचे माजी पंतप्रधान लॉर्ड अॅटली आज येथील वेस्ट मिन्स्टर रुग्णालयात निधन पावले. त्यांचे वय ८४ वर्षांचे होते. लॉर्ड अॅटली १९४५ ते १९५१ या मुदतीत ब्रिटनचे पंतप्रधान होते. ब्रिटनच्या कल्याणकारी राज्याचे प्रवर्तक म्हणून ते समजले जात. आपल्या पंतप्रधानपदाच्या मुदतीतच भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश व सिलोन या राष्ट्रांना त्यांनी स्वातंत्र्य दिले. गेल्या २० सप्टेंबरला त्यांची प्रकृती अतिशय बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काल झोपेत असतानाच शांतपणे त्यांना मृत्यू आला.

अनुवाद आवश्यक
नागपूर - भारतीय एकात्मता होण्याच्या दृष्टीने प्रादेशिक आणि हिंदी भाषेतील ग्रंथांचे अनुवाद होणे आवश्यक आहे. विचारांचे आदानप्रदान व्हावयास हवे. यासाठी प्रत्येकाने मातृभाषेतून अन्य भाषेत किंवा अन्य भाषेतून मातृभाषेत एका तरी ग्रंथाचा अनुवाद करावा, असे आवाहन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते यांनी गुरुवारी येथे केले.

तीर्थंकराचा पुतळा
राजकोट - येथून २० मैलांवर असलेल्या कोटला या ठिकाणी आठवे तीर्थंकर चंद्रप्रभा यांचा संगमरवरी पुतळा येथे झालेल्या उत्खननात मिळाला. सम्राट अशोकाच्या नातवाने उभारलेल्या पुतळ्यांच्या मालिकेचाच हा भाग आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. सौराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी असे एकूण ३ पुतळे गेल्या काही वर्षांत मिळाले आहेत.

मागून मिळत नाही
नागपूर - कोणता तरी उद्योग विदर्भाला द्या हो, अशी भीक मागून उद्योग मिळत नसतो, त्यासाठी स्थानिक लोकांनीच उपक्रमशीलता व साहस दाखविले पाहिजे, असे अत्यंत निर्भीड विचार शुक्रवारी येथे वृत्तपरिषदेत शंतनुराव किर्लोस्कर यांनी व्यक्त केले. ज्या मागास विभागात पैशावर वीस ते तीस टक्के व्याज अनायासे मिळते त्या विभागात उद्योग निघत नसतात, असे सांगून ते म्हणाले की विदर्भ हा असाच विभाग आहे. चळवळ किंवा तक्रारी करीत राहून काम भागणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज