अ‍ॅपशहर

५० वर्षांपूर्वी... २८ डिसेंबर १९६८ च्या अंकातून

५० वर्षांपूर्वी२८ डिसेंबर १९६८ च्या अंकातून...

30 28 Dec 2018, 8:29 am
५० वर्षांपूर्वी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम apollo


२८ डिसेंबर १९६८ च्या अंकातून
अंतराळवीर भूतलावर

केप केनेडी - चंद्राला प्रदक्षिणा घालणारे अपोलो-८ यान आज रात्री ठरलेल्या क्षणी ९ वाजून २१ मिनिटांनी प्रशांत महासागरात अलगद उतरले. अशा रीतीने विजयी अंतराळवीरांचे भूतलावर आगमन झाले आहे. हा प्रवास ऐतिहासिक व अपूर्व असा तर झालाच पण ठरलेल्या मार्गाने आणि ठरलेल्या ठिकाणी ते अचूक उतरल्याने तांत्रिक विक्रमही प्रस्थापित झाला. घरी जाण्याच्या कल्पनेने तीनही अंतराळवीर आनंदात होते. आता अमेरिका अपोलो-९ हे यान पुढच्या वर्षी सोडणार आहे.

महागाई भत्ता पगारात

नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ पगारात समाविष्ट करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. संयुक्त सल्लागार समितीच्या राष्ट्रीय मंडळाने हा निर्णय जाहीर केला आहे. सध्या २६ लाख एकूण केंद्रीय कर्मचारी आहेत. या निर्णयाने सरकारी तिजोरीवर १७ कोटी ६५ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.

चीनचा अणुस्फोट

वॉशिंग्टन - कम्युनिस्ट चीनने सुमारे तीन मेगॅवॉटची शक्ती असलेल्या अणुबाँबचा चाचणीस्फोट घडवून आणला आहे. ही माहिती अमेरिकेच्या अणुशक्ती मंडळाने दिली आहे.

लोणंद येथे कारखाना

सातारा - मक्यापासून स्टार्च बनविण्याचा कारखाना सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे उभारण्यात येणार आहे, असे फलटणचे प्रमुख शेतकरी माधवराव दाते यांनी सांगितले. त्यांच्या अध्यक्षतेखालीच लोणंद येथे झालेल्या बैठकीत हे ठरले. १४ लाख रुपयांच्या या कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून भागभांडवल गोळा करण्यात येणार आहे.

शर्मिला - पतौडी विवाह

कलकत्ता - चित्रतारका शर्मिला टागोर आणि क्रिकेटपटू मन्सूरअलीखान पतौडी यांचा विवाह आज येथे पार पडला. शर्मिला या निका झाल्यानंतर आता सुलताना आयेशा बेगम बनल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज