अ‍ॅपशहर

१९ नोव्हेंबर १९६८

आग्रा येथील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काल बेफाम होऊन शहरात अतोनात धुमाकूळ घातला. किमान पाच चित्रपटगृहांची त्यांनी मोडतोड केली. काचा फोडल्या. चित्रपटांचे फलक खेचून काढले. काही फलक जाळले आणि बस थांब्यावर दगडफेक केली.

Maharashtra Times 19 Nov 2018, 11:28 am
आग्ऱ्यात धुमाकूळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi


आग्रा

येथील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काल बेफाम होऊन शहरात अतोनात धुमाकूळ घातला. किमान पाच चित्रपटगृहांची त्यांनी मोडतोड केली. काचा फोडल्या. चित्रपटांचे फलक खेचून काढले. काही फलक जाळले आणि बस थांब्यावर दगडफेक केली. या प्रकारानंतर शहरातील सर्व चित्रपटगृहांनी आपले खेळ रद्द केले. अलाहाबाद विद्यापीठातील व बनारस हिंदू विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज संप केला होता. चित्रपटगृहात विशेष सवलती, वेगळ्या तिकिट खिडक्या आणि सायकल स्टँड्स यांची त्यांनी मागणी केली.

मराठीची सक्ती

मुंबई

गोव्यामधील सर्व माध्यमिक शाळांत १९७० सालापासून मराठी भाषा सक्तीने शिकविली जाईल अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी आज दिली. गोव्यातील बहुसंख्य माध्यमिक शाळा सध्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. प्रादेशिक भाषा म्हणून त्या शाळांत या वर्षी ऐच्छिक म्हणून मराठी भाषा शिकवली जात असून पुढील वर्षापासून ती सक्तीचा केली जाणार आहे.

महाराष्ट्रात लॉटरी

नागपूर

राज्यात लॉटरी सुरू करण्याच्या प्रश्नावर सरकार सध्या विचार करत आहे, असे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले. अशा लॉटऱ्या महापालिका किंवा इतर निम सरकारी संस्थांनी सुरू करण्यास सरकारने उत्तेजन देऊ नये, असे आपल्या सरकारचे मत आहे असेही ते म्हणाले.

साहित्य संस्कृती मंडळ

मुंबई

महाराष्ट्र शासनाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालील राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली आहे. त्यात आ. रा. देशपांडे, पु. ल. देशपांडे, वि. भि. कोलते, ग. दि. माडगूळकर, ना, गो. कालेलकर, सरोजिनी बाबर, आदींची तीन वर्षांसाठी सभासद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज