ईशा अंबानींनी १२ डिसेंबर २०१८ रोजी आनंद पीरामल यांच्याशी लग्न केलं होतं. हे दोघं आता कृष्णा आणि आदिया या जुळ्या मुलांचे पालक आहेत. ईशा अंबानी यांच्या सासू स्वाती पीरामल कोण आहेत?
स्वाती पीरामल २०१० ते २०१४ पर्यंत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषद आणि व्यापार परिषदेच्या मेंबर होत्या.
स्वाती पीरामल यांनी १९८० मध्ये मुंबई यूनिव्हर्सिटीमधून एमबीबीएसची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून मास्टर्स डिग्री मिळवली.
सध्या त्या इंटरप्रायजेज लिमिटेड कंपनीत उपाध्यक्ष आहेत. त्याशिवाय त्या मुंबईतील गोपाळकृष्ण पीरामल रुग्णालयाच्या फाउंडरही आहेत.
स्वाती पिरामल यांना त्यांच्या समाजसेवेसाठी आणि ग्रामीण भागात आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केल्याबद्दल २०१२ मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वाती पिरामल यांचं नाव ८ वेळा जगातील २५ शक्तीशाली महिलांच्या यादीमध्ये आलं आहे.