छोट्या पडद्यावर 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, आजोबा, शुभ्रा, सोहम, विश्वास, प्रज्ञा या व्यक्तिरेखांसोबतच मॅडी ही व्यक्तिरेखा लोकप्रिय होत आहे. ही व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्रीचे नाव आहे भक्ती रत्नपारखी.
भक्ती रत्नपारखी पुण्याची राहणारी असून मॉर्डन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतल आहे.
भक्तीने मालिका आणि रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या रिअॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली आहे. याशिवाय तिने 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका केली आहे.
भक्ती रत्नपारखीने प्रसिद्ध अभिनेता निखिल रत्नपारखीशी विवाह केला आहे. निखिल यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका साकारल्या आहेत.
भक्ती रत्नपारखी हिने 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत 'मॅडी' नावाची विनोदी भूमिका साकारली आहे.