रणबीर आणि आलियाच्या या गुड न्यूजनंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आलियाने दोन फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही या बी-टाउन कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.
आलियाने फोटो शेअर केल्यानंतर रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरने एका स्टोरी शेअर केली आहे. माझ्या बाळांना आता बाळ होणार असल्याचं म्हणत तिने पोस्ट केली आहे.
आलियाची आई सोनी राजदन यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
आलियाची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजन कपूर हिनेही आलियाचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया आणि आकांक्षा खास मैत्रिणी असून त्या एकमेकींसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात.
आलियाचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक करण जोहरनेही पोस्ट शेअर केली आहे. दोघांना खूप प्रेम...असं म्हणत आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.
रिद्धिमासह प्रियंका चोप्रा, रकूलप्रित सिंग, परिनिती चोप्रा, इशान खट्टर, टायगर श्रॉफ अशा अनेक कलाकारांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
आलियाने हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला आहे. सोनाग्राफीचा हा फोटो असून आलियाच्या बाजूला रणबीर असल्याचंही दिसतंय.
रणबीर आणि आलियाने १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर दोन महिन्यात त्यांनी गुड न्यूज दिली आहे.