आलिया भट्ट तिच्या मैत्रिण आणि बहीण शाहीनसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. या सुट्टीचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले. या सुट्टीचे अनेक सुंदर फोटो आज आपण पाहू. (pics courtesy: hereforaliaabhatt instagram)
या खास ट्रीपवर आलियासोबत 'गिल्ट' अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरही होती.
आलिया भट्टच्या फॅन क्लबवर तिच्या ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
आलिया भट्टसोबत तिची बहीण शाहीनही या मालदीव ट्रीपवर होती. या ट्रीपचे अनेक सुंदर क्षण यावेळी टिपण्यात आले.
आकांक्षा आणि अनुष्का दोघींनीही आपआपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले.
पिंक बिकनीमध्ये आलिया भट्टने दिल्या पोज
आलिया भट्टने बीचवर अनेक सुंदर पोज दिल्या. यातले काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले.
या फोटोत आलिया तिच्या दोन जवळच्या मैत्रिणींसोबत आकांक्षा आणि अनुष्कासोबत डान्स करताना दिसते.
आलिया भट्टने या फोटोंमध्ये गुलाबी रंगाची बिकनी घातली आहे. हे फोटो आलियाच्या फॅन क्लबवर दिसत आहेत.
आलिया भट्टचे फोटो पाहून अनेकांनी ती आपल्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी एन्जॉय करत असल्याचा अंदाज बांधला आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आलियाने लवकर लग्न करणार नसल्याचं सांगितलं.
आलिया आपल्या मैत्रिणींसोबत काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये होती. या ट्रीपवर ती फार आनंदी होती.
आकांक्षाने ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यात आलिया आपल्या मैत्रिणींसोबत बीचवर डान्स करताना आणि तिथेच दुपारचं जेवण करताना दिसते.