अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे जगभरात चाहते आहेत. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ असते. त्यातच, अलीकडे दीपिकानं एक फोटोशूट पार पाडलं. या फोटशूटमधील तिच्या ग्लॅमरस लुकची सध्या चर्चा आहे.
दीपिकाचा हा हटके लुक पाहून तिचे चाहते तिचं भरभरून कौतुक करत आहेत.
दीपिकानं तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर काही तासातच या फोटोंना लाखोंनी लाइक्स मिळाले आहेत.
या वेळी दीपिकाने फोटोशूट साठी चॉकलेटी रंगाची थीम ठेवल्याचे दिसून येते. कारण सगळीकडेच या रंगाचा वापर करण्यात आला आहे. हा रंग
दीपिकाला शोभून दिसतो आहे.
दीपिकाने परिधान केलेला कोट हा तिच्या ड्रेसच्या रंगाला मॅच होईल असा आहे. त्यामुळे दीपिकाचा लुक चर्चेचा विषय ठरतोय
दीपिकानं तिच्या ड्रेसवर कोणतीही भारदस्त दागिने न घालता केवळ एक साधी चेन घातली आहे.