बहिणींच्या नात्यावर आधारलेली 'काव्यांजली' ही मालिका २९ मे पासून कलर्स मराठीवर रात्री ८. ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सचिन खेडेकर पुन्हा एकदा 'कोण होणार करोडपती' मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा कार्यक्रम सोनी मराठीवर २९ मे पासून रात्री ९.०० वाजता प्रक्षेपित होणार आहे.
'मी होणार सुपरस्टार - छोटे उस्ताद पर्व २' हा कार्यक्रम लवकरच स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम १० जूनपासून शनिवार व रविवारी रात्री ९:०० वाजता प्रक्षेपित होणार आहे.
'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम ४ जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अवधूत गुप्ते सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'तुझं माझं सपान' ही मालिका जून महिन्यात सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे.
'रक्षणकर्ता वेतोबा' ही एक आगळ्या वेगळ्या विषयावर आधारलेली मालिका लवकरच सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
झी मराठीवरील 'सारेगमप लिटल चॅम्प्स' देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासाठी ऑडिशन्सदेखील सुरू झाल्या आहेत.
सन मराठीवरही कोकणातील आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
या सगळ्या मालिका जून महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.