सेलिब्रिटींच्या लग्नं, साखरपुड्याचे कार्यक्रम याविषयी नेहमीच प्रेक्षक आणि चाहत्यांना उत्सुकता असते.
अभिनेत्री मौनी रॉयच्या बाबतीतही चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.
बोटातली अंगठी दाखवणारा हा फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर तिच्या चाहत्यांनी 'साखरपुडा झाला का?' असे प्रश्न विचारायला सुरुवात केली.
केवळ चाहतेच नव्हे, तर काही सेलिब्रिटींनीही यावर कमेंट्स केल्या.
पण, हा फोटो तिच्या एका फोटोशूटचा भाग होता हे नंतर कळलं.