चर्चेत राहण्यासाठी अनेक कलाकार रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावतात. शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही गमतीशीर किस्से सांगून ते प्रसिद्धीही मिळवतात.
पण अभिनेत्री रेखा मात्र त्याला अपवाद आहे.
त्या रिअॅलिटी शोमध्ये जाणं टाळतात. पण अलीकडेच त्यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती
त्यावेळी रिअॅलिटी शोमध्ये न जाण्याचं कारण रेखा यांनी सांगितलं. 'लोकांनी मला बघायला मी काही दाखवायची वस्तू आहे का?'
त्यावर कपिल म्हणाला, 'असं असेल तर आम्हा सर्वांना अंदमान-निकोबार बेटांवरच पाठवायला पाहिजे.' दोघांच्या या गमतीशीर जुगलबंदीचा व्हिडीओ कपिलने सोशल मीडियावर शेअर केलाय.